(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अनोखे आणि आपल्याला थक्क करणारे व्हिडिओज शेअर होतात. हे व्हिडिओज आपल्या मनोरंजनाचे काम करतात. अशातच नुकताच इथे एक खूपच गोड आणि क्यूट व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात जंगलातील विशालकाय प्राणी म्हणजेच हत्ती फुटबॉल खेळताना दिसून आले आहेत. या व्हिडिओमध्ये हत्ती एक मोठ्या बॉलसोबत खेळताना दिसतो. तो गवतावर आरामात लेटलेला असतो आणि त्याची लांब सोंड तो वापरून बॉलला इकडे तिकडे फिरवतो. गजराज महाराज अत्यंत आनंदात बॉलसोबत खेळू लागतात जे पाहून सर्वच खुश होऊन जातात. व्हिडिओमध्ये हत्तीच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि गोड भाव स्पष्ट दिसून येतो ज्याने युजर्स सुखावून जातात. पहिल्यांदाच हत्तीला असे फुटबॉलसोबत खेळताना पाहिल्याने इंटरनेटवर हा व्हिडिओ सर्वांचेच लक्ष वेधतो आणि कमी वेळातच व्हायरल होतो.
काय दिसलं व्हिडिओत?
हा व्हिडिओ सेव एलिफंट फाउंडेशनच्या संस्थापिका, लेक चैलर्ट यांनी शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये दोन्ही हत्तींना त्यांच्या शारीरिक अडचणी असूनही खूप आनंदाने एकत्र बॉल खेळताना दिसून येत आहेत. असे व्हिडिओ विशेषतः लोकांना आवडतात कारण ते आपल्याला हत्तींंच्या गोड, शांत स्वभावाची आणि त्यांच्या दृढ इच्छाशक्तीचे दर्शन घडवतात. हत्ती शरीराने कितीही मोठे असले तरी त्यांच्यात ते लहानपण कुठेतरी दडलेलं असतंच. इतर प्राण्यांप्रमाणे ते हिंसाप्रेमी नसतात आणि फार सहजपणे ते माणसांमध्ये मिळून मिसळून राहतात ज्यामुळे लोकांना ते फार आवडतात.
अशा व्हिडिओंमुळे आपल्याला शिकायला मिळते की, जीवनातील अडचणी असतानाही हसत-हसत पुढे जात राहणं महत्त्वाचं आहे. हे व्हिडिओ सेव एलिफंट फाउंडेशनने इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते, ‘चोमपु आणि तिचं नवीन आवडतं खेळणं. तुम्ही पाहू शकता की ती त्याच्याशी किती प्रेम करते, ज्या प्रकारे ती खेळत आहे!’
हा व्हिडिओ @lek_chailert या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लोकांनी व्हिडिओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. कमेंट्सद्वारे युजर्सने फुटबॉल खेळणाऱ्या या हत्तीच्या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हत्ती हे विश्वातील सर्वात सुंदर भव्य निर्मितींपैकी काही आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या दोघांना पाहून चेहऱ्यावर एक मोठं हसू उमललं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.