Bull attack on man up video goes viral
Bull Attack on Elderly Man : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये प्राण्यांच्या हल्ल्याचेही अनेक व्हिडिओ असतात. सध्या उत्तरप्रदेशमधील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशामध्ये गेल्या काही दिवसांता भटक्या बैलांचा वावर वाढला आहे. यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. कधी कुठून कसा बैलाचा हल्ला होईल सांगणे कठीण झाले आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये घडली आहे. एका गल्लीत एक भटका बैल रस्त्याच्या मधोमध थांबला होता. यावेळी एक आजोबा तिथून निघाले होते. त्यांनी बैलाला रस्त्याच्या मधोमध बघून त्याला हटवण्याचा प्रयत्न केला. आजोबांनी काठीने बैलाला धाक दाखवला. पण यामुळे बैलाने संतप्त होत त्यांच्यावर शिंगांनी हल्ला केला. बैलाना आजोबांना शिंगांनी पोटात वार केला, त्यांना भिंतीवर आपटले आणि नंतर त्यांना नाल्यात पाडले. तो एवढ्यावर थांबला नाही. नाल्यात पाडल्यानंतरही बैलाने त्यांच्या पाठीवर शिंगांनी वार केला. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.
व्हायरल व्हिडिओ
#मुजफ्फरनगर शहर की कालोनी में कई दिनों से आवारा सांड घूम रहा था कालोनी के बुर्जुग उसे गली से हटाने गए तो सांड ने उन्हें टक्कर मारकर सींगों से पटक दिया । बुजुर्ग के चिल्लाने से कालोनी के लोग घर से बाहर आए वीडियो देखिए कितना डरावना दृश्य है अब पशुधन विभाग ने सांड को पकड़वा लिया है. pic.twitter.com/m571kvz0ig — Harish Sharma (@Sharma39Harish) October 5, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Sharma39Harish या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना “तो बैल माणसांचा तिरस्कार करतो”, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे, तर दुसऱ्या एका बाप बाप असतो असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत पुरुषांमध्ये तुफान हाणामारी, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.