
ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची Wagon-R रसत्यावर भरधाव वेगात धावताना दिसते. सांगितले जात आहे की, ही घटना दिल्लीतील शक्ती नगर गोलचक्करजवळ घडून आली. चालक डावीकडून एका ई-रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतो पण असं करताना पुढे जाऊन गाडीचा तोल जातो आणि रस्त्यावर घरंगळतच ती पलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन आदळते. चालक गाडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, पण गाडी दुसऱ्या बाजूला जाऊन डिव्हायडरला धडकते. अपघातातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे, जेव्हा गाडीची मागची काच फुटते. मागच्या सीटवर बसलेल्या तरुणाचे डोके आणि शरीराचा वरचा भाग फुटलेल्या काचेतून बाहेर डोकावतो. गाडी पलटी होत असताना तो तरुण अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. सुदैवाने, यात जिवितहानि झाली नाही पण गाडीतील व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. तथापि या अपघातात नेमके किती जण जखमी झाले याची अधिकृत माहिती समोर आली नाही.
दिल्ली के शक्ति नगर गोल चक्कर पर तेज रफ्तार वैगनआर पलटी दिल्ली के शक्ति नगर गोल चक्कर पर तेज रफ्तार वैगनआर अचानक पलट गई. हादसे के बाद मौके पर मौजूद लोग तुरंत मदद के लिए पहुंचे. घटना का वीडियो सोशल मीडिया पर सामने आया है. हादसे में किसी के घायल होने की जानकारी सामने नहीं आई है.… pic.twitter.com/A2shDbsqrP — zingabad (@zingabad) September 24, 2026
अपघतााचा हा व्हिडिओ @zingabad नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “तशी मारुती कार तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवून देईल. सुटका नव्हती. तो वेगात होता आणि आडवाटेने पुढे जात होता”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यात चुकू पूर्णपणे कारचालकाची होती”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “म्हणून ओव्हरटेक मारण्याची चुकी करु नये”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.