मटण बिर्याणीचा मोह चित्त्यालाही आवरता आला नाही, अचानक आला अन् थेट ताटातच घातलं तोंड; अनोख्या मेजवानीचा Video Viral
सोशल मीडियावर वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. सध्याही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक चित्ता चक्क बिर्याणीचा आस्वाद घेताना दिसून आला. बिर्याणी हा पदार्थ सर्वांच्याच आवडीचा आहे पण प्राण्यांमध्येही ती इतकी लोकप्रिय असावी याचा कुणी विचारच केला नसावा. व्हिडिओत नक्की काय घडते ते जाणून घेऊया.
सध्या इंटरनेटवर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काही शेख शाही मेजवानीचा आनंद लुटताना दिसत आहेत. सर्वजण हॉटेलमध्ये बसून बिर्याणीची मजा घेत असतात तितक्यात तिथे अचानक एका चित्त्याची एंट्री होते. यानंतर तो असे काही करतो जे पाहून सर्वच थक्क होतात. वास्तविक चित्ता हा जंगलातील एक धोकादायक प्राणी आहे त्याला पाहताच प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढतात मात्र सध्याच्या या व्हिडिओत चित्त्याने जंगलात नाही तर शाही मेजवानीत एंट्री घेतली.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिखांचा एक गट शाही मेजवानीचा आनंद लुटताना दिसत आहे. तेवढ्यात अचानक एक चित्ता तिथे येऊन बसतो आणि अन्नाचा वास घेत इकडे तिकडे पाहू लागतो. समोर ठेवलेली बिर्याणी पाहताच चित्त्याला राहवत नाही आणि तो थेट ताटात आपले तोंड घालत त्या बिर्याणीचा आस्वाद घेऊन लागतो. हे सर्व दृश्य तेथील एक आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करतो आणि सोशल मीडियावर शेअर करतो. दरम्यान बिर्याणीसाठीची चित्त्याची ही आवड पाहून सर्वच अचंबित होतात. हा व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
चित्त्याचा हा व्हिडिओ @uae_lionking नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि 2 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक दिले आहे. तसेच अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “चित्ताही म्हणत असेल हबीबी प्लेट आणा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाकीचे किती आरामात बसले आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.