(फोटो सौजन्य: instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला अनेक निरनिराळे व्हिडिओ पाहायला मिळतील. इथे तुम्हाला भन्नाट जुगाडापासून ते धक्कादायक गोष्टींपर्यंत सर्वकाही पाहता येईल. बऱ्याचदा इथे अशा घटनाही शेअर होतात ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. इथे माणसांचेच नाही प्राण्यांचीही व्हिडिओ शेअर होतात. हे व्हिडिओ बऱ्याचदा आपल्याला थक्क करतात पण सध्या सोशल मीडियावर एक गोंडस व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये पाहून तुम्ही सुखावून जाल. यात दोन वर्षांच्या चिमुकल्याची आणि कावळ्याची सुंदर मैत्री दिसून आली.
पक्षी हे अधिकतर हवेत उडतात, खुल्या अवकाशसोबत त्यांचे दृढ नाते असते. अशात ते जमिनीवर अधिकतर दिसत नाही. अनेक प्राणी-पक्षी हे माणसांना घाबरून असतात ज्यामुळे ते माणसांच्या जवळ जात नाहीत. मात्र हे समीकरण खोटं ठरवणारा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडिओ कावळा आणि दोन वर्षांच्या मुलाचा आहे ज्यात एकमेकांसोबत मोकळा वेळ घालवताना दिसून आले. त्यांचा हा मजेदार व्हिडिओ इतका गोड आहे की आता तो अनेकांना मोहिनी पाडत आहे.
काय दिसले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, कावळ्याचे नाव रशेल तर मुलाचे नाव ओटो असे आहे. या चिमुकल्याच्या आईने सांगितले की, ओटो जिथेही जातो तिथे रशेल त्याच्यासोबत येतो. तो ओटोसोबत खेळतो, खातो, एवढंच नाही तर काही वेळा भांडतो सुद्धा. ओटो जेव्हा साचालतो तेव्हा हा कावळाही त्याच्यासोबत उड्या मारत मारत त्याच्या मागे चालू लागतो. कावळा रसेलला ओटो शिवाय कोणीही हात लावलेला चालत नाही आणि जर इतर कोणी त्याला हात लावण्याचा प्रयत्न केलाच तर तो रागाने जोरजोरात ओरडू लागतो. एवढेच काय तर मुलगा जेव्हा शाळेत जातो तेव्हा हा कावळाही त्याच्यासोबत शाळेत जाऊन खिडकीत त्याची वाट पाहतो आणि मग शाळा सुटल्यानंतर त्याच्यासोबतच घरी येतो. कावळ्याला चिमुकल्याचा लागलेला लळा पाहून आता अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसत आहे.
कावळा आणि चिमुकल्याच्या या गोड नात्याचा व्हिडिओ @yourpaws.global नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कावळ्याचा वाटत असेल की त्याच्याकडे एक अतिशय गोंडस पाळीव प्राणी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला एवढंच माहीत आहे की कावळा त्याचा रक्षक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.