(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर करू शकता. लोक वेगवेगळ्या अकाऊंटवरून अनेक गोष्टी पोस्ट करतात आणि मग त्यातील काही गोष्टी व्हायरलही होतात. कधी मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी लोकांच्या भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होतात. कधी गोंडस मुलांच्या गोंडस कृतीचे व्हिडिओ व्हायरल होतात, तर कधी मुलांच्या धोकादायक कृतींचे व्हिडिओही व्हायरल होतात. सध्या मात्र इथे एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला अचंबित करू शकतात.
जेवण बनवणे ही एक कला ही जी अनेकांना अवगत नाही. अशात अचानक कधीतरी जेवण बनवायला गेलो की आपल्याकडून अनेक चुका घडून येतात. असाच काहीसा प्रकार सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये घडून आल्याचे दिसून आले. यात काही मूळ मिळून जेवण बनवण्याचा प्रयत्न करत होते मात्र यावेळी तरुणाकडून एक शुल्लक चूक होते ज्याचा भलामोठा परिणाम घडल्याचे दिसून येते. आपली एक चूक आपल्यावर कशी महागात पडू शकते याचे उदाहरण या व्हिडिओतून पाहायला मिळते. घटनेत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसते की, तीन मुले एका सोफ्यावर बसली आहेत आणि स्वयंपाक करण्यासाठी त्यांनी स्वयंपाकघरातून स्टोव्ह बाहेर काढला आणि सोफ्यासमोरच्या टेबलावर ठेवला आहे. एक भाजी कापत आहे तर दुसरा मध्येच बसलेला फोन वाजवत आहे. तिथे एक मुलगा चिरलेली भाजी घेऊन बसला आहे. तो अचानक भाजी उचलतो आणि कढईत ओततो. ही भाजी कढईत टाकताच त्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडतात आणि आगीचे थरारक रूप यावेळी दिसून येते. आता यानंतर पुढे काय झालं ते व्हिडिओत दाखवण्यात आलं नाही मात्र मित्रांचा हा कुकिंग अनुभव सोशल मीडियावर मोठया प्रमाणात शेअर केला जात आहे.
That’s why women live longer💀 pic.twitter.com/rTBj0X7Xph
— 𝐀𝐒𝐔𝐑 (@AsurOfficial_) February 25, 2025
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @AsurOfficial_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मिश्किलपणे, ‘त्यामुळेच महिला अधिक काळ जगतात’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “सावधान रहा सुरक्षित रहा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पुरुष नेहमी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करू पाहतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.