5 कोंबड्यांच्या ग्रुपने केला जबरदस्त डान्स, असे ठुमके लावले की... पाहून तुम्हीही खुश व्हाल; मजेदार Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कुणी स्टंट कारत तर कुणी अनोखे जुगाड शेअर करत. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही हे व्हायरल व्हिडिओज नक्कीच पाहिले असतील. हे कधी आपल्याला हसवतात कधी भावुक करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. आताही इथे असाच एक मजेदार व्हिडिओ वव्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला खळखळून हसवतील. यात काही कोंबड्या चक्क नाचताना दिसून आल्या. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाच कोंबड्या एकत्र नाचत आहेत. हा व्हिडिओ इतका मनोरंजक आहे की तो पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित आणि आनंदी दोन्ही आहेत. कोंबड्या एका मजेशीर गाण्याच्या तालावर नाचत आहेत आणि त्यांची कृत्ये पाहून हसू आवरत नाही. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून लोकांची मने जिंकत आहे. या पाच कोंबड्यांपैकी एक कोंबडी सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे कारण तिची केशरचना पूर्णपणे वेगळी आहे. त्याच्या डोक्यावर कुरळे पिसे आहेत, जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे करतात. बेधुंद होऊन या कोंबड्या नाचू लागतात जे पाहणे फार मनोरंजक ठरते.
व्हिडिओमध्ये एक मजेदार गाणे वाजत आहे, ज्याच्या तालावर ही कोंबडी नाचत आहे. तिचे पंख हलत आहेत, तिचे पाय टॅप करत आहेत आणि असे दिसते की ती खरोखर संगीताचा आनंद घेत आहे. हे दृश्य इतकं मनमोहक दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून या व्हिडिओची आता युजर्सची चांगलीच मजा लुटत आहेत आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहे.
This is why I pay my internet bills on time pic.twitter.com/mO52IQvKoj
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) March 27, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘म्हणूनच मी माझे इंटरनेट बिल वेळेवर भरतो’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 3 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये कोंबड्यांच्या डान्सवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा! ते मजेदार आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे हो, त्यांना लय मिळाली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.