(फोटो सौजन्य – Instagram)
वर्षानुवर्षे मुलींवर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी आपल्यापासून काही लपून राहिली नाही. महिलांवरील या अत्याचाराच्या घटना आता सीमा ओलांडत आहेत. रोज यासंबंधीची नवीन बातमी आपल्या समोर येऊन उभी राहते. कधी कोणाचा छळ होतो तर कधी कुणाची इज्जत लुटली जाते. या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आणि आणखीन भीषण रूप घेत आहेत. आजही या तंत्रज्ञानाच्या युगात महिला किती असुरक्षित आहेत याची प्रचिती देणारा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. यातील दृश्ये तुमचा राग अनावर करतील. नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ तुमच्या तळपायाची आग मस्तकात आणेल. व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगा आपली मर्यादा ओलांडताना दिसून येत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात दोन मुलं आणि त्या दोघांमध्ये एक चिमुकली बसल्याचे दिसून येत आहे. यावेळी दोघेही तिच्यावर जबरदस्ती करत असतात. एक मुलगा तिचा हाथ पकडून ठेवतो तर दुसरा तिच्या भांगेत कुंकू भरतो. यावेळी मुलगी आपल्या जिवाच्या आकांताने रडत असते आणि तिथून बाहेर पडण्यासाठी धडपडत असते. मुलगा नंतर चिमुकलीला जबरदस्ती मिठी देखील मारतो. मुलीचा यात स्पष्ट नकार असतो हे व्हिडिओत दिसून येते.
हा सर्वच प्रकार फार भयानक आणि विकृत प्रवृत्तीचा आहे. व्हिडिओतील चिमुकलीचे घालमेल काळजाला सुन्न करून जाते. या घटनेत पुढे मात्र काय झाले आणि ही घटना नक्की कुठली आहे याबाबत व्हिडिओत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. घटनेचा व्हिडिओ मात्र सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक आता यावर आपला संताप व्यक्त करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @prematil_athavana नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर, ‘तू असं करू नकोस, तुला मुलगी असती तर तू हे केलं असत का’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून बऱ्याच जणांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अशा माणसांना भर चौकात फाशी दिली पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “संविधान आहे की नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.