Child burst out in tears after knowing donald trump is real person video goes viral
सध्या डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेचा विषय बनत आहेत. त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी परदेशी देशांबद्दल कडक धोरण स्वीकारले आहे. टॅरिफच्या निर्णयांनी तर संपूर्ण जगाला हादरुन टाकले आहे. यामुळे ट्रम्प यांचे अनेक शत्रू बनल आहेत. या सर्व जागतिक आणि राजकीय घडामोडींदरम्यान एक वेगळाच प्रसंग समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चिमुकला डोनाल्ड ट्रम्प खरे असल्याचे समजताच रडायला लागला आहे.
झाले असे की, चिमुकल्याला डोनाल्ड ट्रम्प एका कार्टूनमधील पात्र असल्याचे वाटले होते. पण त्याच्याा आईने डोनाल्ड ट्रम्प केवळ एक पात्र नसून खऱ्या आयुष्यातही असल्याचे सांगताच त्याने हंबरडा फोडला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला १३ दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले असून हा व्हिडिओ १० लाखांहून अधिक वेळ शेअर केला गेला आहे.
नेमकं काय घडलं?
या व्हिडिओमध्ये ॲनाबेले पेरेझने तिच्या मुलाचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.
अनाबेले तिच्या मुलाला विचारते की, अँडी काय झाले?
यावर तिचा मुलगा अँडी तिला विचारतो की, डोनाल्ड ट्रम्प खरा माणूस आहे का? (Donald Trump is Real Person)
यावर अँडीची आई अनाबेल हो डोनाल्ड ट्रम्प खरे आहेत असे उत्तर देते. (Yes, Donald Trump is real Person) हे ऐकताच चिमुकला मोठ्या मोठ्याने रडायला लागतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अँडी त्याच्या वडिलांपाशी बसला आहे. वडिलांना त्याा प्रश्न ऐकून डोक्याला हात लावला आहे. त्यांना मुलाच्या प्रश्नावर काय बोलायचे हे समजलेले नाही.
खरं तर अमेरिकेमध्ये ‘Our Cartoon President’नावाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरी एक राजकीय कार्टून आहे. हे कार्टून स्टीफन कोलबर्टने २०१८ मध्ये सुरु केले होते. यापूर्वी कोलबर्टने ‘The Late Show’नावाच्या कार्यक्रमात ट्रम्पवर आधारित काही व्यंगचित्रच प्रसिद्ध केले होते. ही व्यंगचित्र प्रेक्षकांना इतके आवडले की, यावर कार्टून बनवण्यात आली. या शोचे तीन सीझन असून आता ही मालिका बंद करण्यात आली आहे. हा शो न्यूयॉर्कमध्ये अजूनही पाहता येतो. यामुळे अँडीसाठी डोनाल्ड ट्रम्प हे या कार्टूनमधील केवळ एक पात्र होते. मात्र हे पात्र खरे असल्याचे समजताच त्याला धक्का बसला आहे.
व्हायरल व्हिडिओ
Little boy just found out Donald Trump is a real person and is devastated pic.twitter.com/HAFwbcL1Sv
— Mrs. Butters 🥧 (@MrsButters) August 21, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणत आहे की, भावा तुझे दु:ख आम्ही समजू शकतो, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने मलाही जेव्हा हे कळाले तेव्हा असाच धक्का बसला होता. तिसऱ्या एकानेही अशीच प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.