Fact Check : भारतामुळे पाकिस्तानात पूर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' VIDEO ने सोशल मीडियावर खळबळ, सत्य मात्र वेगळंच (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump Viral Video : सध्या पाकिस्तानमध्ये पुरामूळे प्रचंड नुकसान झाले आहे. भारतातून पाकिस्तानकडे वाहणाऱ्या नद्यांना प्रचंड पूर आला आहे. यामुळे पाकिस्तानातील परिस्थितीत अत्यंत बिकट झाली आहे. अनेक घरे, रस्ते पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान या संबंधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारतामूळे पाकिस्तानमध्ये पूर आला असल्याचे म्हणत आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानमधील पूरस्थितीसाठी भारत कारणभूत आहे. भारताने धरणाचे पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानमध्ये पूर आला आहे. सध्या या व्हिडिओमने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे, यामध्ये विशेष करुन भारतीयांचा समावेश आहे.
पण या व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य काही वेगळेच आहे. हा व्हिडिओ डीपफेक असून यासोबत छेडछाड करण्यात आली असल्याचे PIB ने म्हटले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ट्रम्प म्हणताना दिसत आहेत की, काश्मीरमधील धरणांचे दरवाजे भारताने उघडल्याने पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प असे बोललेच नाहीत.
काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य?
डोनाल्ड ट्रम्प यांनी असे कोणतेही व्यक्तव्य केले नसून ओरिजनल व्हिडिओ हा ३० मे २०२५ रोजीचा आहे. प्रत्यक्षात या व्हिडिओमध्ये ट्रम्प भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतरचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्ध त्यांच्यामुळे थांबल्याचा दावा केला आहे. मात्र या मूळ व्हिडिओला डिपफेकच्या मदतीने बनवण्यात आले आहे. यातून लोकांना गोंधळात पाडले जात आहे, भ्रमित केले जात आहे. यामुळे PIB ने अशा व्हिडिओंपासून दूर राहण्याचे आणि कोणत्याही व्हिडिओंवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.तसेच असे व्हिडिओ सापडल्यास प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडे तक्रार करण्यास सांगितले आहे.
🚨 DEEPFAKE VIDEO ALERT!
In an AI-generated deepfake video circulating online, the US President @realDonaldTrump claims that the floods in Pakistan are a result of India opening its dams in Kashmir.#PIBFactCheck
🚨The US President has made NO such statement!
✅ The original… pic.twitter.com/p0GDXvDk6F
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 30, 2025
सध्या पाकिस्तानमध्ये पूराने प्रचंड विध्वंस झाला आहे. यामध्ये २० लाखाहून अधिक लोक बेघर झाले आहेत. गेल्या २४ तासांत २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोकांना आपले राहते घर सोडावे लागले आहे. पंजाब प्रांतातील अनेक गावांना याचा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये परिस्थितीत बिकट झाली आहे. सध्या बचाव कार्य सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्ली मेट्रोत पुन्हा दे दणादण! दोन महिलांमध्ये सीटवरुन जबर हाणामारी, Video Viral