Children steals coal from a moving freight train in film style Video Viral
सध्या सोशल मीडियावर व्हायर होण्याची क्रेझ लोकांमध्ये प्रचंड वाढली आहे. लोक व्हायरल होण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट, विचित्र कंटेट बनवण्याचे प्रमाणा वाढले आहे. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये दोन अल्पवयीन मुले धावत्या मालगाडीतून कोळसा चोरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकांना रणवीर सिंग आणि अर्जून कपूरच्या चित्रपटातील दृश्याची आठवण झाली आहे. ज्यामध्ये चित्रपटातील एका सिनमध्ये ब्रिकम ( रणवीर सिंग) आणि बाला (अर्जून कपूर) धावत्या मालगाडीतून कोळसा चोरत असतात. अगदी तसेच काहीसे दृश्य या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
मुलांचे वय अंदाजे १३ ते १४ पर्यंत असण्याची शक्यता आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही मुले धावत्या टमालगाडीतून एका बोगीतून दुसऱ्या बोगीत जात आहेत. ट्रेनमधून खाली उतरताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यातील आहे. लालमटिया फरक्का एमजीआर रेल्वे मार्गावर ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रेल्वेमार्गाच्या आसपासच्या भागांमध्ये रोज अशा घटना घडत असतात. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अपने गुंडे मूवी में विक्रम और बाल को रेलगाड़ी से कोयला चुराते देखा होगा
यहां आप रियल लाइफ में देख सकते हैं विक्रम और बाला को pic.twitter.com/0wCTq3OLDB
— Bhanu Nand (@BhanuNand) June 21, 2025
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BhanuNand या अकउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. केवळ सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूज साठी हा धोकादायक खेळ मुलांच्या आंगलट येण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ चोरीच्या समस्येवरही प्रकाश टाकतो. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
आजींचा स्वॅगच निराळा! हायवेवर १२० च्या स्पीडमध्ये पळवली बाईक; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.