(फोटो सौजन्य: X)
बिबट्या हा जंगलाचा एक धोकादायक शिकारी आहे. आपल्या वाऱ्यासारख्या वेगाने तो क्षणातच कुणाचीही शिकार शकतो. बिबट्याचा वेग आणि त्याची बलवंत ताकद त्याला इतर प्राण्यांहून वेगळे आणि घातक बनवते. जंगलातील अनेक प्राण्यांची बिबट्या शिकार पडतो पण वेळ आलीच तर मानवी वस्तीतही शिकार करायला तो मागे पुढे पाहत नाही. अशाच एक बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तो मानवी वस्तीत शिकारीसाठी आल्याचे दिसते पण इथे खरा ट्विस्ट काही तरी वेगळाच आहे. व्हिडिओत बिबट्याने कुणाची शिकार केली नाही तर बिबट्या स्वतःच शिकार झाल्याचे दिसून आले आहे आणि तेही एका श्वानाकडून… होय श्वानासारख्या पाळीव प्राण्याने जंगलातील सर्वात धोकादायक शिकाऱ्याला अद्दल घडवून दिली आहे आणि हेच दृश्य आता इंटरनेटवर जोरदार शेअर केले जात आहे. चला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
नाशिकच्या निफाड भागात ही घटना घडून आली आहे ज्यात दोन भटक्या कुत्र्यांनी मिळून बिबट्याला झुंज देत त्याला जमीनदोस्त केल्याचे दिसून आले. ही घटना तेव्हा घडली जेव्हा बिबट्या गावात शिकारीसाठी घुसला होता. बिबट्याला पाहताच दोन्ही कुत्रे अजिबात घाबरले नाही तर मोठ्या धैर्याने त्यांनी बिबट्याला झुंज दिली आणि त्याचा जबडा पकडत त्याला तब्बल ३०० मीटरपर्यंत ओढत नेलं. हे दृश्य इतके थरारक होते की ते पाहून गावकरीही हैराण झाले. कुत्र्याचा हल्ला इतका जबरदस्त होता की बिबट्या क्षणातच घाबरला आणि जीव वाचवण्यासाठी त्याने शेताकडे पळ काढला. व्हिडिओतील हे दृश्य अनेकांना थक्क करणारे असून काहींनी कुत्र्याच्या शौर्याचे कौतुक केले आहे आणि काहींनी असे दृश्य त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसल्याचे सांगितले आहे.
Niphad taluka, Nashik district, Maharashtra, a stray dog chased and overpowered a leopard near Gangurde Vasti, dragging it by the mouth for approximately 300 meters before the leopard fled. #leopard #dogs #attack #viralvideo #animals pic.twitter.com/BJWeoS4y52
— NextMinute News (@nextminutenews7) August 22, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @nextminutenews7 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सुंदर” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खोटं आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांनी मिळून त्याला मारले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.