
५८ लाखांचं पॅकेज, घर-गाडी सगळं तरीही मुलगा मिळेना... चीनच्या ‘दुल्हन मंडई’त हंबरडा फोडून रडू लागली महिला; Video Viral
कुकरच्या शिट्टीत लपवलं १ कोटींचं सोनं; दिल्ली विमानतळावर प्रवाशाचा भांडाफोड; Video Viral
काय दिसलं व्हायरल व्हिडिओत?
मिहिलेने आयुष्यात सर्व गोष्टी मिळवल्या पण तिचे वय तिच्या लग्नाआड आले. खरंतर चीनमध्ये आजही ३० वयानंतर महिलेशी कुणी लग्न करायला बघत नाही. अशात व्हिडिओत दाखवलेल्या महिलेचे वय ३८ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या जास्त वयामुळे महिलेशी कुणीही लग्न करायला तयार नाही आणि याचीच खंत ती व्हिडिओत व्यक्त करताना दिसली. व्हिडिओतील दाव्यानुसार, महिला उच्चशिक्षित असून ५८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज, स्वतःचे घर आणि एक आलिशान गाडी देखील तिच्याजवळ आहे पण इतरं सगळं असूनही वयामुळे कुणीही तिच्याशी लग्नगाठ बांधण्यास तयार नाही.
चीनमधील ब्राइड मार्केट (Marriage Market) सार्वजनिक उद्यानांमध्ये भरणारा एक पारंपरिक बाजार आहे, जिथे पालक आपल्या अविवाहित मुलामुलींसाठी जीवनसाथी शोधतात. हा वधू बाजार चीनमधील शांघायच्या पीपल्स पार्कमध्ये आठवड्याच्या शेवटी भरतो. ही संकल्पना काहीशी अनोखी आहे. पालक आपल्या मुलांची संपूर्ण माहिती (जसे की वय, उंची, शिक्षण, नोकरी, पगार, घर आणि गाडीचा तपशील) एका कागदावर लिहून ठेवतात. यानंतर ते पार्कमध्ये फिरुन इतर लोकांचा बायोडेटा चेक करतात. मग आपआपसात संभाषण होते आणि सर्व गोष्टी पटल्यानंतर प्रोसेस पुढे ढकलली जाते. इथे तरुण किंवा कमी वयाच्या महिलांना अधिक प्राधान्य दिले जाते. दुसरीकडे वयाची तीशी उलटलेल्या महिलांना मात्र इथे ‘लेफ्टओवर व्हुमन’ मानून रिजेक्ट केले जाते.
गबरू जवानाचा माज उतरला, काकांशी पंजा लढवत होता… अखेर तरुणालाच फुटला घाम; मजेदार Video Viral
सोशल मिडियावर व्हिडिओ चर्चेत
आपल्याला कुणीही पसंत करत नाहीये या गोष्टीला कंटाळून व्हिडिओत महिला भावूक होऊन रडताना दिसली. तिची हतबलता पाहून यूजर्सने खंत व्यक्त केली तर काहींनी चीनमधील जुन्या विचारसरणीवर टिका व्यक्त करण्यास सुरुवात केली.
हा व्हिडिओ @nationmatters नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “पाश्चात्य देशांमध्ये, वयाच्या ३० व्या वर्षी लग्न करू इच्छिणाऱ्या तरुणींना सहसा घटस्फोटित आणि मुले असलेले पुरुषच मिळतात; त्यामुळे त्या अशा पुरुषांशी लग्न करण्यास स्पष्ट नकार देतात. त्यांना कोणत्याही बाबतीत ‘तिसरी व्यक्ती’ (किंवा दुय्यम स्थान) म्हणून राहायचे नसते. त्या वयात त्या अविवाहित राहून नोकरी करणे आणि आपल्या मनासारखे आयुष्य जगणे अधिक पसंत करतात.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाई, मी तुम्हाला एक चांगला सल्ला देतो: दुसऱ्या देशात जा, तिथे एखादा जोडीदार शोधा आणि सुखाने राहा; किंवा तुम्हाला तसं करायचं नसेल, तर फक्त सर्वत्र फिरण्याचा आनंद घ्या…”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “खरं तर, चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेले किंवा त्याहून अधिक वयाचे असे अनेक पुरुषही आहेत ज्यांना केवळ तरूण मुलीच हव्या असतात. अविवाहितांच्या या दोन्ही गटांमधील लोक कायम अविवाहितच राहतील”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.