(फोटो सौजन्य: Instagram)
नकाब घातला तर हेल्मेट का नाही? ट्रॅफिक पोलिसांनी तरुणींना शिकवला धडा; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला एक तरुण त्याच्या ताकदीचे प्रदर्शन करताना दिसून येतो. त्याच्या चेहऱ्यावर एका वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास झळकत असतो. कुणीही पंजा लढवायला मी त्याला धुळ चाखवेल म्हणजेच हरवेल असा विश्वास त्याला असतो. अशात तिथून जाणारे एक वयस्कर काका हे पाहतात. काहीतरी नवीन म्हणून तेही उत्साहात येतात आणि चलं पोरा तुला देसी ताकद दाखवतो असं म्हणत ते चॅलेंज एक्सेप्ट करतात.
लढाई सुरू होताच, दोघेही एकमेकांचे हात पकडतात. तरुण आपली सर्व शक्ती पणाला लावतो, पण तो काका मात्र जराही आपल्या जागेवरुन हालत नाही. त्या काकांची पकड आणि तोल इतका अचूक असतो की तरुणाची शक्ती हळूहळू कमी होऊ लागते. संपूर्ण लढाईदरम्यान, तरुणाच्या चेहऱ्यावर घाम आणि पराभवाची भीती स्पष्टपणे दिसते. काका मात्र हसत-खेळत त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहतात आणि हारण्याच्या त्याच्या भितीची मजा लुटतात. तिथे उपस्थित इतर तरुणही काकांची देसी पाॅवर पाहून थक्क होतात आणि चॅलेंजच्या शेवटी टाळ्यांच्या गजरात काकांच्या विजयाचा जल्लोष करतात.
View this post on Instagram
७ हजार किमी पार केलं, आता एक चाकी सायकलवर एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचं ध्येय… केरळच्या तरुणाचं भन्नाट चॅलेंज; Video Viral
हा व्हिडिओ @fitness_by_kaleem नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “भावाने मन जिंकल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाप हा शेवटी बापच असतो”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “जुने ते सोनेच असते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






