
China Introduces First-Ever BBQ Oven At Space Station Video Viral
चीन (China) हा त्यांच्या चित्र-विचित्र खाद्यपदार्थांसाठी, चित्र-विचित्र जेवणासाठी ओळखला जातो. काही काळापासून संशोधन क्षेत्रातही आगळेवेगळे प्रयोग करत आहे. नुकचे चीनने Shenzhou-21 मोहीमेअंतर्गत अंतराळवीरांसोबत उंदीर पाठवले आहेत. याचा उद्देश अंतराळात जैवविज्ञानाचा शोध घेणे आणि अंतराळातील जीवनशैलीचा पृथ्वीवरील सजीवांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणे आहे.
दरम्यान या मोहिमेअंतर्गत गेलेल्या चीनी अंतराळवीरांना एक वेगळा प्रयोग केला आहे. ज्याने संपूर्ण जग आश्चर्याच पडले आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार, चिनी अंतराळवीरांना त्यांच्या तियांगोंग अंतराळ स्थानकावर पहिल्यांदाच बारबेक्यू केले आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की, अंतराळवीर चिकन विंग्स शिजवताना आणि त्याचा स्वाद घेतना दिसत आहे.
शून्य गुरुत्वाकर्षणात चीनने पहिले स्पेस बार्बेक्यू केले आहे. याने जगभरातील लोकांचे लक्ष वेधले आहे.चीनच्या या Shenzhou-21 मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना एक विशेष ओव्हन देण्यात आले होते. यामध्ये अंतराळवीरांना चिकन विंग्स, स्टेक्स आणि फ्रेश बेक केलेले अन्न शिजवले आहे. यावरुन चिनी तंत्रज्ञानात किती पुढे आहे हे लक्षात येते.
संतापजनक! भरधाव कारची स्कूटरला धडक; महिला फरपटत गेली अन्… ; अपघात करुन चालकाने काढला पळ, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
1/2
The Shenzhou-21 crew just pulled off the ultimate space upgrade – they’ve brought a hot air oven to 🇨🇳’s Tiangong Space Station🥳 Now our taikonauts are munching on sizzling, aromatic grilled chicken wings and juicy steaks, pic.twitter.com/L9GaIlsYUy https://t.co/YwRVeeQrBb — momo看世界 (@momoworldview) November 3, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
चिनच्या अंतराळवीरांना दिलेल्या माहितीनुसार, शून्य गुरुत्वाकर्षणाचा आव्हाने लक्षात घेऊन ओव्हन डिझाइन करण्यात आले आहे. तसेच हे ओव्हन अंतराळात वापरण्यासाठी सुरक्षित आणि पूर्णपणे सक्षम आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांनी चिनी लोक कधी काय करतील सांगता येत नाही असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काय आहे चीनची Shenzhou-21 मोहिम?
चीनच्या या अंतराळ मोहिमेत मानवांसोबत चार उंदिर एक नर आणि एक मादी पाठवले जाणार आहेत, ज्यामुळे अंतराळातील वातावरणाचा मानवावर, ज्यामध्ये हाडे, स्नायू, तसेच मानसिक आरोग्य काय परिणाम होईल याचा अभ्यास केला जाणार आहे.
Viral News : मज्जा म्हणून केली DNA टेस्ट अन् समोर आलं भयानक सत्य; सासराच निघाला बाप तर नवरा…
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.