Viral News : मज्जा म्हणून केली DNA टेस्ट अन् समोर आलं भयानक सत्य; सासराच निघाला बाप तर नवरा... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Shocking Viral News : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडे तंत्रज्ञानाच्या काळात तर अशा अश गोष्टी समोर येतात की जाणून अनेकजण आश्चर्यात पडतात. सध्या ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समधून अशीच एक आश्चर्यकारक घटना समोर येत आहे. एका. एका विवाहित जोडप्याच्या नात्याला धक्का बसला आहे. एका विवाहित महिलेने गंमत म्हणून DNA टेस्ट केली होती, परंतु यावंतर एक भयानक सत्य समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
रेडिटवर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, एका महिलेने गंमत म्हणून DNA टेस्ट केली होती. यावरुन तिला भयानक सत्य समजले. तसे तर तिला माहित होते की, तिचा जन्म एका स्पर्म डोनरच्या माध्यमातून झाला आहे. तिच्या आई वडिलांनी तिच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवलेली नव्हती. पण स्पर्म नक्की डोनेट कोणी केला याबद्दल तिला माहित नव्हते. एकादा तिने उत्सुकतेपोटी आपल्या नवऱ्यासोबत डीएनए टेस्टिंग केले आणि पुढं आले ते धक्कादायत सत्य.
यावरुन तिला समजले की तिचे सासरेच तिचे वडील आहेत आणि तिचा नवरा तिचा भाऊ. सुरुवातील महिलेला वाटले की, टेस्टमध्ये कदाचित गडबड झालेली असवी, परंतु पुन्हा टेस्ट केल्यानंतर तोच रिझल्ट आला. यावरुन तिला समजले की, तिच्या सासऱ्यांनीच स्पर्म डोनेट केला होता. यावरुन महिलेचे सासरे आणि तिचा नवरा बायोलॉकिली तिचे भावंड निघाले.
चिमुकल्याचा उपद्रव! लिफ्टमध्येच केली सू सू अन् पुढे जे घडलं, Video Viral
व्हायरल पोस्ट
I just took a DNA test, turns out, I’m 23% related to my husband.
byu/boox98 inTwoHotTakes
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या ही पोस्ट रेडिटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही पोस्ट वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काहींनी म्हटले आहे की, DNA टेस्ट करायची गरजच काय होती?, तर काहींनी म्हटले आहे की, हे सत्य बाहेर आले ते चांगले झाले. या सत्याने महिलेच्या आयुष्यात मोठे वादळ निर्माण झाले आहे. ही पोस्ट शेअर करताना महिलेने सांगितले की, तिला दोन मुले आहेत, सर्व काही सुंदर आणि सुरळीत सुरु होते. परंतु या DNA टेस्टमुळे सर्वांचेच आयुष्य बदलून गेले आहे. त्यांच्या नात्यात दूरावा निर्माण झाला आहे.
आता तर कहरच! दिल्लीत मेट्रो सीटवरुन तरुणी अन् आज्जी थेट एकमेकींना भिडल्या, कारण काय तर…, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






