संतापजनक! भरधाव कारची स्कूटरला धडक; महिला फरपटत गेली अन्... ; अपघात करुन चालकाने काढला पळ, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Accident Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ संतापजनक, तर काही हृदयद्रावक असतात. याशिवाय तुम्ही अपघातांचे थरारक व्हिडिओ देखील पाहिले असतील. सध्या असाच एक भयावह अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका कार चालकाने स्कूटरला जोरदार धडक दिली आहे. यानंतर तिथून पळ काढला आहे. यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक दुचाकीस्वार रस्त्याने जात आहे. त्याच्या हेल्मेटवरील कॅमेरात रस्त्यावरचजे दृश्य कैद होत आहे. याच वेळी रस्त्यावर भरपूर रहदारी आहे. तसेच एक कार वेगाने जात आहे. कार अचानक एका स्टूकरवर असलेल्या कपलला जोरदार धडक देते. यामुळे कपल जोदरात आदळते. मागे बसलेली महिला फरपटत जाते. धक्कादायक म्हणजे धडक दिल्यानंतर कार चालक न थांबाता तिथून पळ काढतो. सध्या या थरारक आणि संतापजनक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडिया पर एक सड़क हादसे का वीडियो सामने आया है, जिसमें एक तेज रफ्तार कार ने बाइक सवार कपल को साइड से टक्कर मार दी. pic.twitter.com/uzK74Hsae3 — Abhishek Kumar (@pixelsabhi) October 25, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @pixelsabhi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांना कारवाईची मागणी केली आहे. एका नेटकऱ्याने अलीकडे लोकांच्यात माणूसकी राहिलेली नाही असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने नक्कीच कोणत्या तरी नेत्याचा मुलगा असणार असे म्हटले आहे.
तर तिसऱ्या एकाने कपलच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारण व्हिडिओत स्पष्ट दिसून येत आहे की कपल जोरात आदळले आहे. विशेष करुन महिला डोक्यावर आदळली असून तिला गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यात आहे. हा व्हिडिओ नेमका कुठाला आहे याची माहिती मिळालेली नाही.
ट्रम्पचा मलेशियात अतरंगी अंदाज! विमानतळावर उतरचा केला डान्स ; VIDEO तुफान व्हायरल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






