Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Viral Video: मुंबईतील चर्चगेट स्थानकावरील ‘ओरिजिन’ नावाच्या चहाच्या स्टॉलवर उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ २६ सप्टेंबरला सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी उंदीर फिरताना दिसत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 05, 2026 | 05:37 PM
viral video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

viral video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चर्चगेटच्या ‘ओरिजिन’ चहाच्या स्टॉलवर उंदीर फिरत असल्याचा VIDEO व्हायरल झाला.
  • तपासणीत स्वच्छतेचा अभाव आणि उघडे खाद्यपदार्थ आढळल्याचे बातमीत नमूद आहे.
  • पश्चिम रेल्वेची कारणे दाखवा नोटीस; स्टॉल तात्पुरता बंद करण्यात आला.
मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे जणूकाही लाईफलाईन आहेत. त्यामध्ये चर्चगेट स्थानक हा गर्दीचा केंद्रबिंदू आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण सकाळचा नाश्ता करत नाही. यासाठी रस्त्यावर मिळणारे किंवा स्टेशनवर मिळणारे अन्न खातात. पण ते किती सुरक्षित आहे, त्यांचा कधी विचार केलाय का? पण आता हाच चहा पिण्याआधी तुम्ही दहावेळा विचार कराल. चर्चगेट स्टेशनवरील एका प्रसिद्ध चहाच्या स्टॉलवर उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रवाशांच्या पोटात खड्डा पडलाय. Viral Video:

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

26 सप्टेंबरला एका प्रवाशाने हा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर टाकला. व्हिडीओमध्ये ‘ओरिजिन’ नावाच्या चहाच्या स्टॉलवर उंदीर मस्तपणे फिरताना दिसत आहे. जिथे खाद्यपदार्थ बनवतात, तिथेच उंदीर पळत होता. हे दृश्य पाहून लोकांनी संताप व्यक्त केला.व्हिडीओ व्हायरल होताच पश्चिम रेल्वेने लगेच ऍक्शन घेतली. त्याच दिवशी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्या स्टॉलवर धाड टाकली. तपासणी केली तेव्हा जे दिसलं ते तर आणखी भयानक होतं.

तपासणीत काय-काय घाण सापडली?

रेल्वे अधिकाऱ्यांनी स्टॉल चेक केला तेव्हा तिथे स्वच्छतेचा पार बोजवारा उडालेला होता. सगळीकडे घाणच घाण होती.पहिली गोष्ट म्हणजे तिथे काम करणाऱ्या ‘एमडी. कसाब’ नावाच्या विक्रेत्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्रच नव्हतं. म्हणजे त्याला काही आजार आहे का, हे पण माहित नाही आणि तो लोकांना खायला देतोय.

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

दुसरी गोष्ट, चटणीचे डबे उघडेच ठेवले होते. झाकणच नव्हतं. त्यात माशा, धूळ पडत असेल. प्लॅटफॉर्मवर सगळीकडे तेल आणि चटणी सांडलेली होती. चिकट जागा झाली होती.वडा बनवण्यासाठी लागणारं मिश्रण आणि शिजवलेले पदार्थ उघड्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवले होते. कोबीची सालं तशीच उघडी पडलेली होती. भांडी धुण्याचं बेसिन तर इतकं घाण होतं की बघवत पण नव्हतं.एकंदरीत सांगायचं तर अन्नसुरक्षेचे सगळे नियम धाब्यावर बसवले होते. कीटक नियंत्रण तर लांबच, साधी साफसफाई पण नव्हती.

Mumbai – A video purportedly showing a live rat moving around a Frankie food stall at Mumbai’s Churchgate railway station has gone viral on social media, prompting concern among passengers over hygiene and food safety. @Tukaram_IndIAS https://t.co/G5lDNjJAEA — NextMinute News (@nextminutenews7) September 29, 2026

रेल्वेने काय कारवाई केली?

हा प्रकार समोर येताच पश्चिम रेल्वेने त्या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. दोन दिवसात लेखी उत्तर द्यायला सांगितलं आहे. जर उत्तर समाधानकारक नसेल तर थेट परवाना रद्द करणार असल्याचा इशारा रेल्वेने दिला आहे.सध्या तरी प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून तो ‘ओरिजिन’ चा स्टॉल 26 सप्टेंबरपासून बंद केला आहे. तात्पुरता त्याला टाळं लावण्यात आलं आहे.

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

प्रवाशांच्या जीवाशी खेळ का?

रेल्वे स्टेशनवर रोज लाखो लोक खातात. त्यांना वाटतं की रेल्वेच्या स्टॉलवरचं खाणं सुरक्षित असेल. पण असं काहीच नाहीये. ही घटना काही नवीन नाही. याआधी पण अनेक स्टेशनवर अशा घाणीचे व्हिडीओ समोर आले आहेत.

Web Title: Churchgate railway station rat video origin tea stall western railway action rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Shocking news
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
1

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
2

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral
3

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral

Meerut Viral Video: नवऱ्याला गर्लफ्रेंड सोबत पकडलं, बायको बोनेटवर लटकली! मेरठमधला थरारक व्हिडीओ व्हायरल
4

Meerut Viral Video: नवऱ्याला गर्लफ्रेंड सोबत पकडलं, बायको बोनेटवर लटकली! मेरठमधला थरारक व्हिडीओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.