Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral

Video Viral: दिल्ली मेट्रोमध्ये महिला प्रवाशाच्या परवानगीशिवाय मोबाईलमधून फोटो काढल्याचा आरोप CISFच्या एका जवानावर करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 17, 2026 | 02:36 PM
‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Delhi Metro CCTV Controversy: दिल्ली मेट्रोमध्ये घडलेल्या एका प्रकारामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मेट्रोच्या डब्यात एका महिला प्रवाशाचे तिच्या परवानगीशिवाय मोबाईलमध्ये फोटो काढल्याचा आरोप केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) एका जवानावर करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर प्रकरणाला मोठे वळण मिळाले. सीआयएसएफनेही या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित जवानाला निलंबित केले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार दिल्ली मेट्रोच्या एम्स स्थानकाच्या परिसरात रात्रीच्या वेळी घडला. एक तरुणी मेट्रोमधून प्रवास करत असताना तिच्यासमोर एक सीआयएसएफ जवान उभा होता. काही वेळाने त्या जवानाच्या हातातील मोबाईलकडे तिचे लक्ष गेले. तो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने तिचे फोटो घेत असल्याचा तिला संशय आला. Video Viral

तरुणीने घाबरून शांत बसण्याऐवजी थेट जवानाला याबाबत विचारले. सुरुवातीला त्याने फोटो काढल्याचा आरोप नाकारला. मात्र, तरुणीने आपला मुद्दा सोडला नाही. तिचा आवाज ऐकून डब्यातील इतर प्रवाशांनीही परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. काही प्रवाशांनी जवानाकडे मोबाईल तपासण्याची मागणी केली.

A woman accused a CISF personnel of secretly photographing her at a metro station. He denied it, but her photo was allegedly found in his gallery. https://t.co/VUclS8b1Kj — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 16, 2026

यानंतर जवानाने मोबाईलमधील गॅलरी उघडल्याचे सांगितले जाते. त्यावेळी त्यात संबंधित तरुणीचे फोटो आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे डब्यातील वातावरण अचानक तापले. अनेक प्रवासी तरुणीच्या बाजूने उभे राहिले आणि जवानाला या प्रकाराबद्दल जाब विचारू लागले.

डब्यात धक्काबुक्की

या घटनेनंतर आणखी एक गंभीर दावा समोर आला. काही प्रवाशांनी जवानाने आपले शस्त्र बाहेर काढून त्यांच्याकडे रोखल्याचे सांगितले. त्यामुळे काही काळ डब्यात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले. मात्र, या दाव्याबाबत दिल्ली मेट्रो पोलिसांनी वेगळी माहिती दिली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जवानाने पिस्तूल प्रवाशांवर रोखल्याचे आरोप खरे नसून असा प्रकार झाल्याचे आढळलेले नाही.

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला; VIDEO पाहून डोळे पाणावतील

गोंधळ वाढल्यानंतर जवानाने मेट्रोच्या डब्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले. प्रवाशांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ धक्काबुक्की झाली. संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ कोणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि नंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

या प्रकरणाची माहिती पोलिसांना रात्री सुमारे १२ वाजून ४० मिनिटांनी मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, संबंधित तरुणीने पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली नाही. तरीही व्हिडिओ समोर आल्यानंतर सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःहून या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले. सीआयएसएफने संबंधित जवानाला तातडीने निलंबित केले असून त्याच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत नेमका प्रकार काय घडला, मोबाईलमध्ये फोटो कसे आले आणि घटनेच्या वेळी जवानाचे वर्तन कसे होते, याचा तपास केला जाणार आहे.

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

Web Title: Cisf jawan suspended over alleged unauthorized photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • cisf constable
  • Delhi Metro
  • viral video

संबंधित बातम्या

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO
1

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
2

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
3

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
4

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.