
India vs New Zealand Test Series
पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. सुरुवातीला भारताने अचूक मारा करत न्यूझीलंडच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र नंतर फिलिप्स आणि निकोलसने गोलंदाजांना फेस आणला. त्यातच 74 व्या ओव्हरमध्ये देवदत्त पडीकलने निकोलसचा कॅच सोडला. हा कॅच सोडल्यानंतर पंत आणि गिलची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.
पहिल्या दिवशी भारतीय संघाने न्यूझीलंडने 82 ओव्हर्समध्ये 243 रन्स करत 5 विकेट्स केल्या होत्या. मात्र त्यानंतर हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने भारतीय गोलंदाजांचा सामना करत खणखणीत फलंदाजी केली.तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात न्यूझीलंडने वेगाने 103 रन्स केल्या. देवदत्त पडिक्कलने कॅच सोडल्यावर गिल आणि पंत नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
India will be ruing that missed opportunity! How big will this miss prove to be? 🤔 Watch the HERO VIDA India Tour of New Zealand, 1st Test, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #SonyLIV #NZvIND https://t.co/GuVawgAAf8 — Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 19, 2026
शतक झळकावणाऱ्या हेन्री निकोल्सला आउट करण्याची सुवर्णसंधी भारताकडे चालून आली होती. प्रसिद्ध कृष्णाच्या एका बॉलवर निकोलसने मोठा फटका मारला. तो कॅच देवदत्त पडीकलकडे गेला. मात्र त्याच्या हातातून तो कॅच सुटला. डावाच्या ७४व्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर शतकवीर हेन्री निकोल्स याचा कॅच देवदत्त पडीकलकडून सुटला.
मात्र यामध्ये संवाद नसल्याने किंवा काहीसा संभ्रम कॅच सुटण्यास कारणीभूत असल्याचे पाहायला मिळाले. देवदत्त पडिक्कल आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत यांच्यात ‘माझा की तुझा’ असा गोंधळ उडाल्याने हाती आलेला कॅच सुटला. कॅच सुटल्यावर देवदत्त पडिक्कल आणि ऋषभ पंत एकमेकांकडे पाहत राहिले. दुसऱ्या बाजूला कर्णधार शुभमन गिल याचा चेहराही चांगलाच पडलेला दिसला. या चुकीमुळे गिल प्रचंड नाराज झाल्याचे स्पष्ट जाणवत होते.
Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे खेळवला जात आहे.
Ans: हिल्या कसोटी सामन्यात देवदत्त पडीकलने हेन्री निकोल्सचा सोपा कॅच सोडला. यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या मैदानावरील प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.