
Madhya Pradesh police fake case viral video
सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणाच्या बॅगेत गांजा ठेवून त्याला तस्करीच्या प्रकरणात अडकवण्याची पोलिसांनी धमकी दिल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांनी तुफान टीका केल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एएसपीसह सहा पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, सिवनी येथील एका हॉटेलमध्ये एक सज्ञान प्रेमी जोडपे मुक्कामी होते. त्याचदरम्यान काही पोलिस कर्मचारी हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांनी दोघांची चौकशी केली. या कारवाईदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला. त्यामध्ये तरुणाच्या बॅगेत गांजा ठेवून त्याच्यावर तस्करीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Donald Trump: अबब! हे असे कसे झोपले? जिनपिंग यांचे भाषण अन् ट्रम्प यांच्या डुलक्या? Video Viral
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले. हॉटेल संचालकानेही पोलिस अधिकाऱ्यांवर कथितरीत्या अवैध वसुली आणि नियमबाह्य पद्धतीने हॉटेलमध्ये कारवाई केल्याचे आरोप केले. प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि शासनापर्यंत पोहोचल्यानंतर कारवाईला वेग आला.
एएसपी, एसडीओपी, टीआयसह सहा जणांवर कारवाई
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस महासंचालक कैलाश मकवाना यांच्या स्तरावरून निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या स्तरावर कारवाई करण्यात आली. एएसपी दीपक मिश्रा, एसडीओपी चंचलेश मरकाम आणि टीआयसह एकूण सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचा कठोर इशारा
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोशल मीडियाद्वारे या कारवाईची माहिती दिली. व्हायरल व्हिडीओ प्रकरणात प्रथमदर्शनी संशयास्पद वर्तन आढळल्याने एएसपी, एसडीओपीसह सहा पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
This is the thoroughly corrupt police of my state, Madhya Pradesh, India. Every policeman must collect bribes and pass on cuts from them that go all the way to @DGP_MP and @CMMadhyaPradesh. These lowlifes are threatening a girl with a fake drugs case: https://t.co/PirZgvMRxi — Jayant Bhandari (@JayantBhandari5) November 17, 2026
पोलिसांच्या वर्दीत अनुशासनहीनता आणि गैरवर्तन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असे मुख्यमंत्री यादव यांनी स्पष्ट केले. पोलिस दलात शिस्त, जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य असून, दोषींविरोधात ‘झिरो टॉलरन्स’च्या धोरणानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Ans: हॉटेलमध्ये थांबलेल्या सज्ञान प्रेमी जोडप्याला तरुणाच्या बॅगेत गांजा ठेवून तस्करीच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी पोलिसांकडून दिल्याचा आरोप आहे.
Ans: एएसपी दीपक मिश्रा, एसडीओपी चंचलेश मरकाम आणि टीआयसह एकूण सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Ans: मुख्यमंत्री मोहन यादव यांनी प्रथमदर्शनी संशयास्पद वर्तन आढळल्याने सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले.