
पती-पत्नी आणि ती! सरकारी निवासस्थानी CO साहेबांचे लफडे उघडकीस (Photo Credit - X)
रांची (झारखंड): झारखंडमधील गढवा जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय घटना समोर आली आहे. येथे एका पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्या सरकारी निवासस्थानी एका अनोळखी महिलेसोबत असताना त्यांच्या पत्नीने रंगेहाथ पकडले आणि बाहेरून दरवाजा बंद करून घरात कोंडले. या पोलीस अधिकाऱ्याची पत्नी डॉ. श्यामा रानी या आहेत. पती दुसऱ्या महिलेसोबत घरात असल्याचे पाहून त्यांनी तातडीने घराला बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर घराबाहेर मोठी गर्दी जमली आणि या ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १ नोव्हेंबर रोजी घडली. मझिआंव येथील सर्कल ऑफिसर (CO) प्रमोद कुमार हे एका महिलेसोबत त्यांच्या सरकारी निवासस्थानातील खोलीत होते. याची माहिती त्यांची पत्नी डॉ. श्यामा रानी यांना मिळाली. पत्नीने सकाळी-सकाळी सरकारी निवासस्थान गाठले आणि पतीला दुसऱ्या महिलेसह पकडल्यानंतर बाहेरून दरवाजा बंद करून टाकला.
गढ़वा जिले के मंझिआव अंचल अधिकारी प्रमोद विवाहित होने के बावजूद,किसी अन्य महिला के साथ उनके अवैध संबंध का खुलासा उनकी पत्नी ने स्वयं किया। घटना रंगे हाथ पकड़े जाने के बाद से यह मामला क्षेत्र में चर्चा का विषय भी हो गया है।जनसेवा से जुड़ा अधिकारी जब इस तरह के विवादों में घिरता है,… pic.twitter.com/2MZV5SzTtD — Shashank Shekhar (@Shashan92920145) November 1, 2025
पत्नीने दरवाजा उघडण्यास नकार दिल्यावर आणि पोलीस दल घटनास्थळी येत असल्याची माहिती मिळाल्यावर CO प्रमोद कुमार यांनी घाबरून खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परिणाम या प्रयत्नात ते जखमीही झाल्याचे सांगण्यात येत आहे.
माहितीनुसार, CO प्रमोद कुमार यांची पत्नी डॉ. श्यामा रानी या बिहारचे माजी खासदार रामजी मांझी यांची कन्या आहेत. त्यांना गेल्या काही दिवसांपासून आपल्या पतीच्या वागणुकीवर संशय होता. १ नोव्हेंबरला पती सरकारी निवासस्थानी दुसऱ्या महिलेसोबत असल्याची माहिती मिळताच त्या सकाळी तिथे पोहोचल्या आणि त्यांनी ही कारवाई केली. घटनेची माहिती मिळताच मझिआंव पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. घरात सापडलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर पुढील तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये सोपवले. या घटनेमुळे पोलीस दलात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.