5 स्टार हॉटेलमध्ये पोटभर खाल्लं अन् बिल द्यायची वेळ येताच पर्यटकांनी काढला पळ, कर्मचाऱ्याने पकडताच रस्त्यात सुरु झाला राडा... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही अतरंगी व्हिडिओ असतात, तर काही धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही पर्यटकांनी राजस्थानमध्ये असे काही केले आहे की, मोठ्या पेचात पडले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, काही पर्यटकांनी एका हॉटेलमध्ये जेवणे केल होते परंतु त्याचे बिल न देताच त्यांनी पळ काढला आहे. यामुळे हॉटेलच्या मालकाने त्यांचा पाठलाग केला आहे. परंतु ट्राफिक जामममुळे पर्टकच चांगल्याच पेचात फसले आहेत.
नेमकं घडलं काय?
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या एका हॉटेलमध्ये एक पर्यटक कुटुंब जेवणासाठी गेले होते. त्यांनी जेवणासाठी विविध प्रकारचे स्वादिष्ट जेवण ऑर्डर केले. त्याचा भरपेट आनंद घेतला. त्यांच्या जेवणाचे बिल १० हजार ९०० रुपये झाल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. परंतु पर्यटक बिल न देताचा पळून गेले होते.
असा काढला पर्यटकांनी पळ
या पर्यटकांनी टॉयलेटमध्ये काही वेळ ब्रेक घेतला आणि सर्वजण एक एक करुन बाहेर पडले. यानंतर त्यांनी आपल्या कार घेतली आणि हॉटेलमधून बाहेर पळ काढला. बिल न देताच पाचही जण पळून गेले. हॉटेल मालकाच्या आणि वेटर्सच्या लक्षात येताच त्यांनी पर्यटकांचा पाठलाग केला आणि त्यांना गाठले. पर्यटक ट्राफिकमध्ये अडकले होते यामुळे ते चांगलेच पेचात अडकले. यानंतर हॉटेल मालकाने पोलिसांना या घटमेती माहिती दिली. तसेच या घटनेचा व्हिडिओ देखील काढण्यात आला. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की, पर्यटकांना पकडण्यात आले आहे. तसेच हॉटेल मालक आणि पर्यटकांते भांडणही सुरु आहे.
रस्त्यावर झुंफली मुलींची WWE फाईट, धक्का देताच तरुणी गेली जमिनीखाली… भयंकर हाणामारीचा Video Viral
व्हायरल व्हिडिओ
Gujju inspiring Gujjus
Gujarati tourists rack up ₹10,900 hotel bill, try to flee in luxury car; caught on Ambaji Road, payment recovered online ! pic.twitter.com/Pl9BHZeazU — Shuvodip (@shuvodip99) October 26, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @shuvodip99 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्टकांनी बिल न देणे टाळण्याचा पूरपुर प्रयत्न केला परंतु त्यांना शेवटी बिल भरावेच लागले आहे. पर्यटकांकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी तिथून पळ काढला होता. बिल पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली होती. परंतु शेवटी त्यांनी आपल्या एका मित्राला फोन केला आणि ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






