(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज काही ना काही शेअर केलं जातं. शेअर केलेल्या या साध्यासुध्या नसून यात अनेक अशी दृश्ये दाखवली जातात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. हेच कारण आहे की, कमी वेळेतच हे व्हिडिओ सोशल मिडियावर ट्रेंड करु लागतात. नुकताच सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात निसर्गाचा अद्भूत चमत्कार दाखवण्यात आला. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, पाऊस पडत असल्यास संपूर्ण वातावरण हे ढगाळ बनते. वेगवेगळ्या भागात पडणाऱ्या पावसाची क्षमता कमी-जास्त असू शकते. पण एकाच रस्त्यावर अर्ध्या बाजूला पाऊस तर अर्ध्या बाजूला ऊन असे चमत्कारी दृश्य तुम्ही पाहिले आहे का? नसेल तर आता व्हिडिओत तुम्हाला ते पाहता येणार आहे. या अनोख्या आणि आश्चर्यकारक दृश्यांनी सोशल मिडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करु लागली आहेत.
पाण्यामध्ये झाली भयानक लढाई, मगरीच्या जबड्यात अडकला अजगर; थरारक दृश्ये अन् पुढे जे घडलं… Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एका रस्त्यावर घडून आलेले दुर्लभ दृश्य दाखवण्यात आले आहे. यात एकाच रस्त्यावर एका बाजूला जोरजोरात पाऊस पडत आहे तर दुसऱ्या बाजूला ऊन पडत असल्याचे दिसते. व्हिडिओत दिसून आलेल्या या घटनेला “सूर्यपाऊस” म्हणून ओळखले जाते. यात एकाचवेळी ढग फक्त आंशिक भागावर असतात, त्यामुळे काही भागात पाऊस पडतो आणि काही भागात सूर्य तळपत राहतो. या वेळी आकाशात इंद्रधनुष्य दिसण्याची शक्यताही जास्त असते. महाराष्ट्रात मराठीमध्ये याला “कोल्ह्याचे लग्न” असंही म्हटलं जातं. या वाक्प्रचाराचा वापर नैसर्गिक घटनेसाठी केला जातो, म्हणजेच जेव्हा पाऊस पडत असतो आणि त्याच वेळी ऊनही असते. व्हिडिओतील या दृश्यांनी लोकांना मात्र चांगलंच अचंबित केलं आहे. अनेकांना व्हिडिओ आवडलाही आहे, ज्याचा अंदाज आपण व्हिडिओला मिळालेल्या व्यूजवरुन लावू शकतो. या व्हिडिओला तब्बल 18 मिलियन व्यूज मिळाले आहेत.
या घटनेचा व्हिडिओ @weekendvibeswithvarma नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील अद्भूत दृश्यांनी लोकांना इतकं अचंबित केलं की अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “बालपणीचं स्वप्नं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कॉलेजमध्ये असताना, मी वेगाने सायकल चालवायचो आणि पाऊस माझा पाठलाग करत असल्यासारखे वाटायचे. कधी मी जिंकलो, तर कधी पाऊस. ते ओडिशातील जुने चांगले दिवस होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बेंगळुरूला या मी तुम्हाला एकाच वेळी तीन ऋतू दाखवतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






