couple bike romance one more video goes viral
अलीकडच्या तरुण पिढीला नमेकं काय झालं आहे कळत नाही. चित्रपटातील हिरो हिरोइन्सच्या बाईक रोमान्सने खऱ्या आयुष्यातील तरुणांना वेड लावले आहे. जिकडे बघावे तिकडे लोक फिल्मी स्टाईलमध्ये बाईकवर रोमान्स करत आहे. भर रस्त्यात तरुणांचा हा पराक्रम सुरु आहे. नुकतेच उत्तर प्रदेशाच्या पोलिसांनी नोअडा एक्सप्रेसवर एका कपलला बाईक रोमान्स करताना पकडले होते. शिवाय भारी-भक्कम दंडही ठोठावला होता. मात्र तरीही लोक सुधारण्याचे नाव घेत नाही. उत्तरप्रदेशच्या गोरखपुरमधून आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉऑर्म एक्सवर @VishnukrSonkar या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
यामध्ये कपल धावत्या बाईकवर रोमान्स करत आहे. प्रेयसी बाईकच्या पेट्रोलच्या टाकीवर प्रियकराला मिठी मारुन बसली आहे. शिवाय हेलम्टही घाललेले नाही. दोघेही वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. रस्त्यावार वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु आहे. मात्र या प्रियकरांना कसेलीही भान नाही. आसपासचे लोक काय, म्हणतील कोणी काय बोलेल याचे जाऊद्या. पण त्यांना स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी नाही. चुकूनही बाईक चालवताना तरुणाचा तोल गेला, किंवा अचानक मोठ्या गाडीला धडकले तर यामुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पण हे प्रेमी जोडपे मात्र आपल्याच नादात आहे.
गोरखपुर के रामगढ़ताल रोड पर एक युवक अपनी प्रेमिका को गोद में बैठाकर बाइक चलाता नजर आया। इस नज़ारे ने लोगों को चौंका दिया और सवाल उठ रहे हैं कि ऐसे स्टंट सड़क सुरक्षा के लिए खतरा हैं।#Gorakhpur #RoadSafety #ViralVideo #CoupleOnBike pic.twitter.com/EQldRFpC3V
— Vishnu Kumar Sonkar (@VishnukrSonkar) August 23, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
गेल्या काही काळात असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. बाईक रोमान्सचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक लोकांना संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. या प्रेमी जोडप्यांना तुरुंगात डांबून हाणले पाहिजे असे म्हटले आहे, तर अनेकांनी यांच्या घरच्यांना सांगा, म्हणजे सगळी गुर्मी उतरले असे म्हटले आहे. लोकांकडून यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
आधी श्वानाला बेदम मारहाण मग बाईकला बांधून …; अहमदाबामधील व्यक्तीचे संतापजनक कृत्य, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.