आधी बेदम मारहाण, मग बाईकला बांधून..., श्वानासोबत व्यक्तीचे धक्कादायक कृत्य; प्राणी प्रेमींनी केला संताप व्यक्त, Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने श्वानाला बाईकला बांधले आणि फरपटत नेले आहे. ही घटना अहमदाबामध्ये घडली असल्याचे सांगितले जात आहे. याचा घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून प्राणी प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकांनी संबंधित व्यक्तीवर करावाईची मागणी केली आहे. सांगितले जात आहे की, या व्यक्तीने आधी श्वानाला बेदम मारहाण केली होती. नंतर त्याला बाईकला बांधले आणि गावभर फरपटत नेले. त्यानंतर व्यक्तीने त्याला पूलाखाली सोडून दिले.
सध्या त्याचा श्वानाला बाईकवरुन फरपटत नेत असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे प्राणी प्रेमींमध्ये विशेष करुन संतापाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार, प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर न्यायालयीन कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
पण या घटनेमुळे अहमदाबादमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असल्याचे समोर आले आहे. दिल्लीमध्येही भटक्या कुत्र्यांवरुन मोठा वाद सुरु होता. सध्या न्यायालयाने आक्रमक कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचा आणि इतर कुत्र्यांचे लसीकरण, नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण केवळ दिल्लीच नव्हे तर देशाच्या इतर काही भागांमध्येही भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.
अहमदाबाद में एक शख्स ने कुत्ते के साथ ऐसा सलूक किया की मानवता भी शर्मा जाए. pic.twitter.com/YPaQxtIFwH
— Hemraj Singh Chauhan (@JournoHemraj) August 24, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @JournoHemraj या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून संताप व्यक्त केली आहे. अनेकांनी अलीकडे लोकांमध्ये माणूसकी नावाची गोष्ट उरलेली नाही असे म्हटले आहे, तर काहींनी भटक्या कुत्र्यांसोबत असेच झाले पाहिजे असे म्हटले आहे. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील कुत्रा नेमका पाळीव होता की, स्ट्रीट जॉग याची माहिती मिळालेली नाही. तसेच पुलावर नेऊन सोडल्यानंतर त्या कुत्र्याचे काय झाले याचीही माहिती मिळाली नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.