दुनिया गई भाड़ में, हम दोनों प्यार में! रस्त्यावर घेतलं आलिंगन अन् लागली गाड्यांची लांबच रांग; लोक म्हणाले,"हा तर Fevicol चा जोड"
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात . हे व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करतात, कधी हसवतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. इथे बऱ्याचदा कपल्सचेही अनेक मजेदार व्हिडिओ शेअर केले जातात. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही हे व्हिडिओज नक्कीच पाहिले असतील. आताही इथे प्रेमीयुगुलांचा एक अतरंगी व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला चेहऱ्यावर हसू आणेल. यावेळी कपलमधील मारामारीच्या किंवा फसवेगिरीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आकंठ प्रेमात बुडालेल्या जोडप्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
कपल एकमेकांच्या प्रेमात इतके बुडतात की भररस्त्यात ते एकमेकांना घट्ट मिठी मारतात. ही मिठी इतकी जबरदस्त असते की त्यांच्यावर आजूबाजूच्या परिस्थितीचा कोणताही परिणाम होत नाही. प्रेमात मारलेली ही मिठी त्यांच्यासाठी आनंददायक ठरत असली तरी इतर प्रवाशांना यामुळे त्रास सहन करावा लागला. कारण जोडपं रस्त्याच्या मधोमध उभं राहून एकमेकांना आलींगन देत होत ज्यामुळे अनेक गाड्या त्यांच्यासमोर येऊन थांबल्या आणि तिथे वाहतूक कोंडी निर्माण झाली. अहो एवढंच काय तर यात स्वतः ट्राफिक पोलिसांनाही पण हस्तक्षेप करावा लागला.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात ट्राफिक सिग्नलला काही गाड्या थांबल्याचे दिसून येत आहे. एका बाजून काही वाहने जाताना दिसून येत आहेत. तर त्यातच तुम्ही नीट पाहिले असता तुम्हाला व्हिडिओत रस्त्याच्या मधोमध एक कपल दिसून येईल. ते दोघेही भररस्त्यात एकमेकांना मिठी मारून उभे असतात. त्यांच्या या मिठीमुळे वाहनांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण होतो आणि त्यांनतर ट्रॅफिक पोलिसांसह अनेक नागरिक नागरिक त्यांना तेथून दूर करायला त्यांच्याजवळ जातात. मात्र ते दोघेही एकमेकांना काही सोडायला तयार होत नाहीत आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत त्यांनी एकमेकांना मिठी मारल्याचे दिसून येते. व्हिडिओतील हे दृश्य पाहून युजर्स मात्र चांगलेच अवाक् झाले असून काहीजण हा फेविकॉलचा जोड आहे तुटणार नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया देत आहेत.
हा व्हिडिओ पुण्यातील पिंपळे सौदागर चौकातील असल्याचे व्हिडिओत स्पष्ट करण्यात आले आहे. व्हिडिओला @pune_is_emotion नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लाखोंच्या व्युज आणि हजारो लाइक्सनंतर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आमच्या पुण्यात हुशार लोक आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “7 जन्माचे भांडण मिटलं वाटत” .
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.