(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अनोखे आणि अजब-गजब व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ नेहमीच आपल्याला हसवण्याचा काम करतात. यातील काही दृश्ये तर अशी असतात की ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. आताही सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून आला ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच कोड्यात पाडलं. हे दृश्य इतके अनोखे आहे की क्वचितच असे हे दृश्य तुम्ही कधी पाहिले असेल. आजवर तुम्ही जलपरीच्या अनेक कथा ऐकल्या असतील किंवा टीव्हीवर याचे दृश्य पाहिले असेल. सोशल मीडियावर यासंबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या गेल्या आहेत. जेव्हाही हे दृश्य समोर येते तेव्हा ते लोकांना थक्क केल्याशिवाय राहत नाही.
जलपरी ही मुळातच एक पाण्यातील जीव असल्याचे सांगितले जाते. यात त्याचे शरीर महिलांसारखे असते मात्र कमरेपासून खालचा भाग हा माशासारखा असतो. सोप्या भाषेत जलपरीचे अर्धे शरीर हे माणसांसारखे असते आणि अर्धे शरीर हे माशांप्रमाणे दिसते. आजवर जलपरीचे अनेक फोटो किंवा व्हिडिओ आपण पाहिले असतील मात्र वास्तविक, जलपरा नावाच्या जीवाला तुम्ही कधी पाहिले आहे का? हे अद्भुत आणि अनोखे दृश्य सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओतील अजब-गजब दृश्ये लोकांना कोड्यात पाडत असून हे लोक आता या व्हिडिओने चांगलीच गोंधळात पडली आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक व्यक्ती खाली जमिनीवर उलटा पडून झोपल्याचे दृश्य दिसून येत आहे. मुख्य म्हणजे यात त्याचे डोकं माणसांप्रमाणे तर कमरेखालील शरीर हे एका अजगाराप्रमाणे लांबलचक असल्याचे दिसून आले. माणूस आपले डोकं मागे फिरवत आपल्या पसरलेल्या शरीराकडे पाहत राहतो, यावेळी त्याच्या डोक्यावरही एक छोटा साप चिपकून बसलेला असतो. हे दृश्य इतके भयाण आणि अजब असते की ते पाहण्यासाठी तिथे लोकांची गर्दी जमा होते. व्यक्तीचे शरीर इतके जबरदस्त आणि खरेखुरे दिसत असते की लोक यावर विश्वास ठेवावा की नाही या विचाराने गोंधळात पडतात. मात्र या अकाउंटवरील इतर व्हिडिओ पाहून असे दिसून आले की हा व्हिडिओ खरा नसून तो फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने बनवण्यात आला आहे. खरंतर व्यक्तीने कमरेपासून पायांपर्यंत एक कपडा लावलेला असतो ज्यात तो आपले पाय लपवतो आणि यातच त्याच्या पाळलेल्या अजगराचे तोंड लपलेले असते. व्यक्ती आपले पाय आणि अजगराचे तोंड लपवून स्वतःला जलपरा दाखवण्याचे प्रयत्न करतो. व्हिडिओत तुम्ही निरखून पाहिले तर तुम्हाला ते स्पष्ट दिसून येईल.
व्हिडिओतील हे दृश्य जरी खरे नसले तरी याने युजर्सना नक्कीच मोठा धक्का दिला आहे. ज्याने व्हिडिओचे सत्य समजले तो खळखळून हसला आणि ज्याला सत्य नाही समजले तो आश्चर्याच्या धक्क्याने कोड्यात पडून राहिला. हा व्हिडिओ @phriie_putranaja नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो युजर्सने पाहिले असून हजारोंनी यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नागीण फ्रॉम मिषो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एडिटिंग चांगली केली आहे”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जय नागदेवता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.