
Couple romantic pre wedding shoot at Pune metro station Video viral
Pune Metro Pre-Wedding Shoot : पुण्यामध्ये एक भलताच प्रकार घडला आहे. वेगळंपणा करायच्या नाद एका कपलला भोवाला आहे. सध्या सर्वत्र लग्नाचा सीझन चालू आहे. यामुळे अनेक कपल लग्नाआधी प्री वेडिंग शूट करुन घेत आहे. गेल्या काही काळात हा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. पण अनेकदा काही कपल अशी ठिकाणी फोटो शूट करतात, ज्यामुळे त्यांना फटका बसतो. पुण्यातील एका कपलने देखील असेच केले आहे.
या कपलने पुण्यातील विविध मेट्रो स्टेशनवर आणि मेट्रोमध्ये फोटो शूट केले आहे. परंतु त्यांच्यावर मेट्रो प्रशासनाकडून मेट्रोच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या अंतर्गत कपलवर कारवाई करण्यात आली आहे. या कपलने शूट करण्यासाठी कोणतीही अधिककृत परवानगी पुण्याच्या मेट्रो प्रशासनाकडू घेतलेली नव्हती. तसेच शूट चालू असताना मेट्रो स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी त्यांना नकारही दिला होता. परंतु कपल आणि फोटोग्राफरने कोणाचे ऐकले नाही. त्यांचे शूट शुरुच होते. मेट्रो प्रशासनाने अनेक वेळा शूट थांबवण्यास सांगितले होते. पण त्यांनी एकले नाही. यामुळे मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि शिस्त राखण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. तसेच व्यावसायिक आणि कोणत्याही प्रकारचे शूट करण्यासाठी मेट्रो प्रशासनाची परवानगी बंधनकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
कपलच्या या फोटोशूटने सध्या पुण्यात धुमाकूळ घातली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून लोकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी मेट्रो प्रशासनाच्या कारवाईला समर्थन दिले आहे. या फोटोशूटमुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे. तर काहींनी फोटोशूट करण्यात काय चुकीचे आहे, असा प्रश्न केला आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातली आहे. कपलचे फोटोशूट कितीही भन्नाट आले असले तरी, यामुळे त्यांना चांगला भुरदंड बसला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.