आ बैल मुझे मार! दारु पिऊन पठ्ठ्या थेट बैलाला भिडला अन्...; पुढं जे घडलं पाहून हसू आवरणार नाही, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Funny Viral Video : सोशल मीडियावर दररोज काही नाही काही मजेशीर व्हायरल होत असते. यामध्ये स्टंट, जुगाड, भांडण, भन्नाट असे डान्स रिल्स, मिम्स, जोक्स यांसारख्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे आपण खळखळून हसतो. सध्या असाच एक मजेशीर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने दारुच्या नशेत असे काही केलं आहे जे त्याला भयंकर महागात पडले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बैलासमोर उभा आहे. पठ्ठ्या बैलाला आव्हान देत आहे. त्याच्यासमोर आपल्या जांघेवर हात मारत हिरोगिरी करत आहे. हे पाहून बैलाला राग येतो. यानंतर जे घडतं भयानक आहे, पण पाहून तुम्ही खळखळून हसाल. बैला राग आल्याने तो थेट पठ्ठ्यावर हल्ला करतो. त्याला शिंगानी उचलून हवेत फेकतो आणि खाली आपटण्याचा प्रयत्न करतो. पण पठ्ठ्या देखील वरचढ आहे. बैलाच्या शिंगांना पकडून त्याच्या पाठीवर बसून राहतो. बैल त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो. पण पठ्ठ्या काही त्याची शिंगं सोडत नाही. पण बैल देखील हुशार आहे. शिंगांनीच पठ्ठ्याला गोल गोल फिरवतो. शेवटी बैलाल थांबवण्यासाठी आसपासचे काही लोक येतात. म्हटले जात आहे की, व्यक्तीने हे सर्व दारुच्या नशेत केले आहे.
घोर कलियुग! समोर चिता जळत होती अन् ‘ती’ डिजेच्या तालावर…, धक्कादायक Video Viral
व्हायरल व्हिडिओ
ये तो वही बात हो गई आ बैल मुझे मार 🤣 pic.twitter.com/d1BhmVrTog — Bilal Ahmad || बिलाल अहमद (@BilalShabbu) November 6, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @BilalShabbu एक्सवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये, हे तर आ बैल मुझे मार, सारखे झाले असे म्हटले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. एकाने देशी दारुची कमाल आहे ही, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने आ बैल मुझे मार, म्हणीचा आज प्रत्यय आला असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने बैलाने तर गांभीर्याने घेतलं असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






