(फोटो सौजन्य: X)
जंगलातील थरारक आणि धोकादायक प्राण्यांमध्ये बिबट्याचा प्रामुख्याने समावेश होतो. आपल्या वेगाच्या जोरावर तो कुणालाही मृत्यूच्या जाळ्यात अडकवू शकतो, अशात त्याच्यापासून चार हात लांब राहणेच बरं ठरत. मागील काही काळापासून बिबट्याच्या दहशतीमुळे महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील नागाळा पार्कमध्ये बिबट्या बचाव मोहिम राबवली जात होती आणि यातच नवी घटना समोर आली. या मोहिमेदरम्यान बिबट्याने पोलिसांवरच हल्ला चढवल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून सर्वच प्लॅटफाॅर्मवर या व्हिडिओला वेगाने शेअर केले जात आहे. नक्की काय घडलं ते चला जाणून घेऊया.
अरे बापरे! फळ आहे की सोनं? 10 कोटींचा सफरचंद सर्वत्र ठरलाय चर्चेचा विषय; नक्की काय खास आहे यात?
नक्की काय घडलं?
बिबट्याला पकडण्याच्या या प्रयत्नात पोलिसांनी काठ्या आणि राॅड घेऊन बिबट्याला घेरण्याचा प्रयत्न केला. तथापि, अशा परिस्थितीत बिबट्याने स्वत:च्या बचावासाठी पोलिस अधिकाऱ्यांवरच हल्ला चढवला. ही घटना शहराच्या मध्यभागी असलेल्या महावितरण कार्यालयाजवळ घडून आली. इथे एक बिबट्या व्यावसायिक क्षेत्रात घुसला होता. अशात लोकांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात पोलिस अधिकारी बिबट्याच्या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याच्यापासून दूर पळताना दिसून आले. या गोंधळात पोलिस अधिकारी पळता पळता जमिनीवर पडतो देखील… घटनेचा आणखीन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात पोलिस कर्माचारी बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसले.
महाराष्ट्र के कोल्हापुर में एक।कॉलेज में तेंदुए की होने की जानकारी के बाद जब वहां पुलिस पहुंची तो तेंदुए ने पुलिस वालो पर ही हमला कर दिया. तेंदुए की तलाश जारी है. pic.twitter.com/0ze2CxBuvO — Vivek Gupta (@imvivekgupta) November 11, 2025
महाराष्ट्र के कोल्हापुर में कॉलेज में घुसा तेंदुआ जब वहां पुलिस पहुंची तो तेंदुए ने पुलिस वालो पर ही हमला कर दिया तेंदुए के हमले का #livevideo#leopard #live #Maharashtra pic.twitter.com/gGg72iKEeT — Naresh Parmar (@nareshsinh_007) November 11, 2025
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्याने तातडीने प्रतिक्रिया दिली आणि बिबट्याला लाथ मारली आणि काठीने त्याला हाकलून लावले. वन अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की या कारवाईदरम्यान एका पोलिस अधिकाऱ्यासह दोन जण जखमी झाले आहेत. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वृत्त आहे. घटनेचा व्हिडिओ हा @nareshsinh_007 आणि @imvivekgupta या दोन एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






