अंडी फोडली आणि बाहेर आला चिमुकला पाण्याचा राक्षस! क्रूर वृत्ती, गोंडस चेहरा... पाहूनच व्हाल अवाक्; Video Viral
सोशल मिडियावर नेहमीच अनेक अनोखे आणि आपल्याला आश्चर्यचकीत करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे माणसांनेच नाही तर प्राण्यांचेही अनेक दृश्ये शेअर केली जातात, जी आपण क्वचितच कधी पाहिली असतील. असाच एक अनोखा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात पाण्याचा राक्षस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मगरीचे छोटी छोटी चिमुकली पिल्ले अंड्यातून बाहेर पडताना दिसून आली. मगरीच्या पिल्लांना असं जन्माला येताना पाहणं सर्वांसाठीच नवी बाब होती, ज्यामुळे याचा व्हिडिओ पाहताच सर्वजण अचंबित झाले आणि लोकांनी हा व्हिडिओ वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत नक्की काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरणाऱ्या या व्हिडिओमध्ये, एक लाल टप दिसून येत आहे ज्यात असंख्य पिल्ले फिरत आहेत. निरखून पाहिल्यास आपल्याला ही पिल्ले मगरीची असल्याचे समजते. आता याचवेळी एक माणून आपल्या हातात आणखीन एक अंड घेऊन त्यातून आणखीन एका पिल्लाला बाहेर काढतानाचे दृश्य दाखवू लागतो. तो एक कैचीच्या साहाय्याने अंडी फोडतो आणि त्यातून लगेचच एक मगरीचे पिल्लू बाहेर निघतं. त्याचं ते चिमुकलं रुप पाहायला काही क्षणासाठी चांगले वाटत असले तरी त्याचे लहान पण टोकदार दात आणि डोळ्यांचा तो रंग त्याच्या क्रुरपणाचा साक्षातकार घडवत असतो. मगरीच्या जन्माचे हे दृश्य याआधी कधीही फारसे कोणी पाहिले नाही ज्यामुळे हा व्हिडिओ शेअर होताच लोक अचंबित होऊन ही दृश्ये शेअर करु लागतात.
Comes into the world like “who’s first”! pic.twitter.com/AxGAL6LkcI — Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 20, 2025
आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 7.4 मिलियनहून अधिकच्या व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते ती सगळी अंडी का उघडत आहेत?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या जगात तुमचं स्वागत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते घृणास्पद दिसत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.