(फोटो सौजन्य: X)
सोशल मिडियावर प्राण्यांच्या शिकारीचे अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. अशातच आता इथे शिकारीचा आणखीन एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक मगर फार शिताफीने एका रानडुक्कराची शिकार करताना दिसून आली. आपल्या ताकदीमुळे आणि शिकारीच्या तरबेजामुळे तिला पाण्याच्या राक्षसाची उपमा देण्यात देण्यात आली आहे. पाण्यात सर्वत्र मगरीचं राज्य चालतं आणि अशातच या पाण्यात एंट्री घेण आपल्या जीवासाठी किती घातक ठरु शकत हे आपल्याला या व्हिडिओतून दिसून येत. चला व्हिडिओत नक्की काय आणि कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
हिरोगिरी नडली! फोटोसाठी कॉन्स्टेबलने कोब्राला तोंडात धरला अन्…; पुढं जे घडलं भयानक, Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात एक रानडुक्कर पाणी पिण्यासाठी नदीकिनारी जात असल्याचे दिसते. त्याच्या मागे यावेळी काही जंगली कुत्रेही उपस्थित असतात जे काहीसे घाबरल्याचे व्हिडिओत दिसून येतात. कदाचित त्यांनी पाण्यात लपून बसलेल्या मगरीला पाहिलं असावं, ज्यामुळे पुढे जाण्यासाठी ते घाबरत असतात. रानडुक्कराला मात्र मगर पाण्यात असल्याचे कळत नाही ज्यामुळे तो पाणी पिण्यासाठी पुढे जातो पण तितक्यातच मगर त्याच्यावर आपला जबरदस्त हल्ला चढवते आणि क्षणातच त्याला पाण्यात खेचून आत ओढते. हे पाहून मागे उभे असलेले जंगली कुत्रे आणखीन घाबरतात आणि चार पाऊले मागे जाऊन हा सर्व प्रकार पाहू लागतात. मगर मात्र रानडुक्कराला थेट पाण्यातच घेऊन त्याची शिकार करते. हे दृश्त मात्र आपल्याला जंगलातील क्रुर सत्याचा आरसा दाखवून देते.
pic.twitter.com/iAi6Dfd0Mb — Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) September 21, 2025
मुंबईच्या रस्त्यावर Lamborghini चा धुमाकूळ; कोस्टल रोडवर भीषण अपघात, थरकाप उडवणारा Video Viral
दरम्यान शिकारीचा हा व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे क्रुर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते मागे असलेले प्राणी ओरडत होते का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जीवनाचा खेळ, खा किंवा शिकार व्हा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.