(फोटो सौजन्य: Instagram)
आई ही जगातील सर्वात मोठी योद्धा मानली जाते. या जगात आईहून निस्वार्थी प्रेम आपल्यावर कुणीही करु शकत नाही. मायेने आपल्याला गोंजारणारी, आपल्यावर संकट आल्यास ढाल म्हणून पुढे उभी राहणारी आई वेळ आल्यास आपल्या बाळाला वाचवण्यासाठी रणरागीणीचे रुप धारण करु शकते. आईचे हे प्रेम फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही तितकंच खोल असतं आणि याचित प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी बदकाच्या पिल्लाला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते पण तितक्यातच त्याची आई मुलीला अशी अद्दल घडवते की सर्व पाहतच राहतात. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, तलवाच्या किनारी एक बदक आई आपल्या सर्व पिल्लांना घेऊन पाण्यात जाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी मागून एक मुलगी तिथे येते. चिमुकल्या गोंडस पिल्लांना पाहतात आईची नजर चुकवत त्यातील एका पिल्लाला गूपचूप हातात घेऊन तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यातच पिल्लाची आई तिला हे सर्व करताना पाहते आणि क्षणाचाही विलंब न करता मुलीच्या अंगावर धावून जाते. मग काय बदकीनीच्या हल्ल्याने मुलगी घाबरते आणि लगेचच आपल्या हातातील पिल्लू जमिनीवर टाकून देत तिथून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढते. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आई बदक ढाल बनून मुलीशी लढली जे पाहून सर्वच सुखावले आणि तिच्या प्रमाचे काैतुक करु लागले. काहींनी मात्र व्हिडिओत झालेल्या प्रकारावरुन मुलीची खिल्ली उडवली. आईच्या प्रेमाची ताकद दाखवणारा हा व्हिडिओ यूजर्सना चांगलाच आवडला, ज्यामुळे वेगाने त्याला इंटरनेटवर शेअर केले गेले.
मुंबईच्या रस्त्यावर Lamborghini चा धुमाकूळ; कोस्टल रोडवर भीषण अपघात, थरकाप उडवणारा Video Viral
व्हिडिओला @smile_connection_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती विसरली होती का? त्याच्यासोबत त्याची आईही आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आई नेहमीच निर्भय असते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जितक्या वेगाने ती पिल्लू उचलायला गेली त्याच्या दुप्पट वेगाने ती तिकडून घाबरुन पळाली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.