पक्ष्याची शिकार करत आनंद घेत होता साप तितक्यात मगरीची झाली एंट्री; एका क्षणातच दोघांना गिळंकृत केले अन्... शिकारीचा Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओही शेअर केले जातात ज्यात आपल्याला शिकारीचे थरारक दृश्य दिसून येते. जंगलाचा नियम आहे इथे एकाला जगायचे असले तर दुसऱ्याचे मरणे अटळ आहे अशातच आता शिकारीचा एक थरार सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यातील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणू शकतात. वास्तविक, यात एका मगरीने एका झटक्यात दोन शिकाऱ्यांची शिकार केल्याचे दिसून आले. पाण्याच्या राक्षसाची ही शिकार आता सोशल मीडियावर लक्षणीय बाब ठरत आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
पाण्यात राहून मगरीशी वैर घेणं पडलं महागात थेट हल्ला केला अन्…; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात नदीच्या काठावर एका सापाने एका पक्ष्याला पकडल्याचे दिसून येते. साप आपल्या शिकारीची मजा घेतच असतो की तितक्यात एक मगर गुपचूप तिथे येते आणि क्षणाचाही विलंब न करता मगर सापासह पक्षालाही आपली शिकार बनवते. व्हिडिओमध्ये साप पक्ष्याला कसे पकडतो हे दाखवले आहे, परंतु मगरीच्या अचानक एंट्रीमुळे सर्व काही बदलून जाते. मगर, जो एक मोठा शिकारी आहे, तो दोघांनाही एकत्र खातो. यावरून हे स्पष्ट होते की निसर्गात कोणताही क्षण सुरक्षित नाही. ही घटना आपल्याला सांगते की एक शिकारी स्वतः देखील शिकार बनू शकतो. शिकारीचे हे दृश्य दुर्लभ आहे ज्यामुळे ते वेगाने इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
Food chain is WILD
pic.twitter.com/7xT3Bx2wOA— Science girl (@gunsnrosesgirl3) June 21, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @gunsnrosesgirl3 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ लोकांना इतका आवडला आहे की त्याला आतापर्यंत ३ मिलियनहुन अधिकच्या व्युज मिळाल्या आहेत तसेच लाखो लोकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत. यासोबतच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत मगरीच्या या शिकारीवर आपले मतही व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “नर प्राण्यांची अवस्थाही पुरुषांसारखी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एक जीव दुसऱ्या जीवाला खातो, ही परिसंस्था आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे तर असं झालं की चिकन नगेट्ससह फ्रीचे फ्राइज पण मिळाले”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.