(फोटो सौजन्य: Instagram)
आई म्हणजे माया, प्रेम आणि त्यागाचं जणू दुसरंच नाव! जगात कुणीही आपल्यावर इतकी माया आणि प्रेम दाखवत नाही जितकी आपली आई आपल्यावर दाखवते. जगाविरुद्ध जाऊन ती मोठ्याहून मोठ्या आणि कठीण संकटातूनही आपल्यातही बाहेर काढते. अशातच आता आई या शब्दालाच काळिमा फासणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यातील आईच्या कृतीने सर्वांचेच हृदय सुन्न करून सोडले आहे. वेळ आली तर जगाशी लढून आपल्या मुलाचा जीव वाचवणारी आई व्हिडिओत मात्र स्वतःच्याच मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकताना दिसून आली. ही घटना आता सर्वांच्याच आश्चर्याचा धक्का देत असून याचे फुटेज आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे जे वेगाने व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक महिला मुलीला जबरदस्ती ओढत आणून तिला इमारतीच्या खाली फेकून देताना दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार, आई आणि मुलगी दोघीच घरात एकट्या होत्या अशातच आईने मुलीला घराबाहेर काढत ओढत ओढत इमारतीच्या कठड्याजवळ आणले आणि निर्दयपणे तिला कठड्यावरून खाली फेकून दिले. यांनतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर झालेल्या मुलीला रुग्नालयात दाखल केले. हा व्हिडिओ नक्की कुठला आणि कधीच हे जरी अद्याप समजलं नसलं तरी याचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील सर्व दृश्य पाहून आता युजर्स मात्र यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @gurugorakhnathjiom नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पाळता येत नसेल तर तिला कोणत्या तरी अनाथ आश्रमात टाकून दिलं असतं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिने आपल्या अपंग मुलीला फेकून दिले”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “याआधी तिला किती टॉर्चर केले असेल काय माहित”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.