पाणी प्यायला गेला अन् क्षणातच मगरीने चित्त्याला खेचले पाण्यात, जोडीदाराचे हाल पाहून दुरूनच भावुक झाली मादी चित्ता; Video Viral
सोशल मीडियावर जंगल आयुष्याशी निगडित अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात आपल्याला प्राण्यांचे आयुष्य आणखीन जवळून पाहता येते. आपल्या पोटासाठी दुसऱ्याची शिकार करणे हा जंगलाचा सामान्य नियम आहे. याचे जिवंत उदाहरण आपल्याला व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळत असते. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही प्राण्यांच्या शिकारीचे अनेक थरारक व्हिडिओ आजवर पाहिले असतील. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे मात्र यातील दृश्ये तुमच्या कल्पनेपलीकडील आहेत.
चित्ता, जंगलाचा मुकुट नसलेला राजा आहे जो आपल्या भक्ष्याला एक क्षणातच आपल्या वेगाने मृत्यूच्या दारी पोहचवतो. चित्त्याचा वेग हा आजवर सर्वात वेगवान मनाला जातो मात्र आताचा व्हायरल व्हिडिओ हे मत चुकीचे सिद्ध करत आहे. यात सर्वात वेगवान शिकारीच वेगात कमी पडल्याने मृत्यूला बळी पडल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये तलावाच्या काठावर पाणी पीत असताना एक मगर बिबट्यावर अजोरदार हल्ला करताना दिसते, यावेळी चित्त्याला काही समजेल तितक्यातच त्याला पाण्यात ओढले जाते जे पाहून सर्वच आवाक् होतात.
काय घडले व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक चित्ता पाणी पिण्यासाठी तलावाच्या काठावर पोहोचतो, त्याने मान खाली घालून पाणी पिण्याचा प्रयत्न करताच नदीच्या आत लपलेली मगर विजेच्या वेगाने बाहेर येते. डोळ्याचे पारणे फेडताना, मगर बिबट्याची मान त्याच्या मजबूत जबड्यात पकडते आणि त्याला पाण्याखाली ओढते. हे दृश्य इतकं धोकादायक आणि धक्कादायक आहे की ते पाहून प्रत्येकजण थक्क होतो. या घटनेवेळी बिबट्याचे कुटुंब जवळच होते. हल्ल्यानंतर ते शोधण्याचा प्रयत्न करतात, मात्र मगरीचा वेग इतका होता की, चित्ता क्षणार्धात गायब होतो. बिबट्याचे बाकीचे कुटुंब तलावाच्या आजूबाजूला पाहतात, पण तो कुठेच सापडत नाही जे पाहून ते उदास आणि निराश दिसतात.
शिकारीचा हा वेगवान आणि धक्कादायक थरार @animalsbn नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कंमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप दुःखद, मगरीने तिच्या प्रदेशाची शक्ती वापरली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्ही जरी जंगलात राज्य करत असाल पण पाण्यात तुम्ही पाण्याचा राजा नाही बानू शकत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.