(फोटो सौजन्य: Reddit)
तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही इथे अनेक वेगवगळे रंजक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिले असतील. हे व्हिडिओ लोकांचे चांगलेच मनोरंजन करतात ज्यामुळे कमी वेळातच ते व्हायरल होतात. सध्याही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुमच्यासाठी फार रोमांचक ठरतील. यात दोन सरकारी कर्मचारी आमने-सामने भिडल्याचे दिसून आले आहे. विना तिकीट प्रवास करत असताना एका पोलीस आदिकाऱ्याला टीटीई पकडतो आणि सर्व प्रवाशांसमोर पोलिसाला फटकारण्यास सुरुवात करतो. ही संपूर्ण घटना तेथील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केली असून आता ती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक एसी ट्रेनच्या डब्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला फटकारताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये टीटीई त्याच्या गणवेशात खालच्या बर्थवर झोपलेल्या पोलिसाला फटकारताना स्पष्ट दिसून येत आहे. हा व्हिडिओ आता अनेकांना थक्क करत असून लोक आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
विना तिकीट पोलीस अधिकाऱ्याला पाहताच टीटीई त्याला म्हणतो “तुम्हाला वाटते की टीटीई वर्दीधारी अधिकाऱ्याच तिकीट पाहू शकत नाही? तुमच्याकडे सामान्य कोचचे तिकीटही नाही, पण तुम्ही अजूनही एसी कोचमध्ये झोपला आहात,” तो पोलिस कर्मचाऱ्याला फटकारत हिंदीत म्हणतो. पुढे तो म्हणतो, “घरचा नियम आहे कुठेही जा, काहीही करा. ती जागा वर्दीवाल्या लोकांसाठी रिकामी आहे का? इथून उठ आणि बाहेर हो. मला स्लीपरमध्ये नाही तर जनरलमध्ये दिसा. त्याचे हे बोल ऐकून पोलिस शांतपणे उठून तिथून निघून जातो.” आता सोशल मीडियावर टीटीईच्या व्हिडिओ आणि कृतीचे कौतुक केले जात आहे.
TTE confronts a cop for travelling without ticket in the AC coach
byu/Depressed-Devil22 inindianrailways
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @r/indianrailways नावाच्या रेडीट अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, ‘एसी कोचमध्ये विना तिकीट प्रवास केल्याबद्दल टीटीईचा एका पोलिसाशी सामना’ असे लिहिण्यात आले आह. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे पोलीस धोकेबाज आहेत. ते विना तिकीट प्रवास करतात आणि तिकिटांसह प्रवाशांची जागा घेतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “टीटीचे छान काम केले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.