(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता ज्यात दिसते की, एक व्यक्ती विट घेऊन फर्शीवर बसला आहे. तो स्क्रु ड्रायव्हर आणि हातोडीच्या मदतीने विटेला एका नागमोडी वळणाने फोडत थोडी जागा तयार करतो. यानंतर तो एक स्प्रिंग घेऊन तिला त्या जागेत व्यवस्थित फिट करतो. यानंतर तो एक वायर जोडताना दिसतो. पुढील दृश्यांमध्ये आपल्याला एक भांड या देसी हिटवर ठेवल्याचे दिसते ज्यातील पाणी उकळत असते. भांड्याला बाजूला करताच याखालील हिटर चालत असल्याचे दिसते ज्याची शेक घेत व्यक्ती आपल्या हिटरची मजा घेतो. तरुणाच्या या अनोख्या जुगाडावर आता अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत त्याच्या जुगाडाची प्रशंसा केली तर याच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले.
हा व्हिडिओ @maximum_manthan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या हिटरमध्ये सेफ्टी नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “देसी जुगाड कधीकधी धोकादायकही ठरू शकतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा आहे खरा इंजिनियर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






