Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ

Stunt Viral Video : भाईंदर-नायगावदरम्यान खाडीवरील रेल्वे पुलावर तरुणांचा जीवघेणा स्टंट सुरु होता ज्याचे दृष्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. या घटनेमुळे सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित होत असून प्रशासन यावर काय भूमिका घेणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 12, 2026 | 12:10 PM
भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल व्हिडिओमध्ये रेल्वे पुलावर तरुण धोकादायक स्टंट करत असल्याचे दिसत आहे.
  • व्हिडिओ खरा असल्यास संवेदनशील रेल्वे परिसरात तरुण पोहोचले कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
  • व्हिडिओची तांत्रिक तपासणी करून सत्यता स्पष्ट करण्यासोबतच रेल्वे पुलाच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची मागणी होत आहे.
विजय काते – भाईंदर ते नायगावदरम्यान खाडीवरील रेल्वे पुलावर काही तरुण जीव धोक्यात घालून स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे रेल्वेच्या अतिसंवेदनशील परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हायरल व्हिडिओबाबत तो तयार करणाऱ्यांकडून हा व्हिडिओ AIच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की बनावट, याची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक आहे.

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

व्हिडिओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात काही तरुण पुलावर लटकून स्टंट करताना दिसून येतात. खाली खाडी तर वरुन भरधाव वेगाने रेल्वे जात असते पण भितीचा एक लवलेशही यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर नसतो. चुकून जरी यावेळी कुणाचा हात फिसकटला तर मोठा अनर्थ होऊ शकतो. ही घटना इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून यूजर्सने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात असे आणखी प्रकार घडू नयेत यासाठी तरुणांवर कारवाई होणे गरजेचे आहे असे काहींचे मत आहे.

सुरक्षेवर प्रश्न

विशेष म्हणजे, जर हा व्हिडिओ खरा असेल तर एवढ्या संवेदनशील रेल्वे परिसरात हे तरुण पोहोचले कसे? त्यांना पुलाच्या परिसरात प्रवेश मिळाला कसा, त्याठिकाणी सुरक्षारक्षक किंवा निगराणी यंत्रणा होती का, तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून अशा हालचालींवर लक्ष ठेवले जाते का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

भाईंदर आणि नायगावदरम्यानचा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, खाडीवरील रेल्वे पूल हा सामान्य नागरिकांसाठी मुक्त प्रवेशाचा परिसर नाही. अशा ठिकाणी अनधिकृत प्रवेश झाल्यास संबंधित व्यक्तींसह रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वीही रेल्वे परिसरातील धोकादायक प्रकारांचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता तपासून, तो खरा असल्यास संबंधित तरुणांवर कारवाई करण्याबरोबरच रेल्वे पुलाच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची मागणी होत आहे.

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

दरम्यान, नायगाव-भाईंदर परिसरातील रेल्वे आणि खाडीशी संबंधित पायाभूत सुविधांबाबत यापूर्वीही विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. नायगाव खाडीवर भविष्यात मेट्रो आणि वाहनांसाठी दुमजली पूल उभारण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे. आता या व्हायरल व्हिडिओमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा याबाबत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Dangerous stunt on the bhayandar naigaon railway creek bridge video raised questions about railway safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • mira bhaynder
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
2

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
3

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
4

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.