
हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
माहितीनुसार हा व्हिडिओ इंडोनेशियातील असून यात एक व्यक्ती सापासोबत धोकादायक स्टंट करताना दिसून येतो. व्यक्तीचे नाव माइक असून व्हिडिओत तो प्रथम एका छोट्या सापाला हातात पकडून त्याला हळूहळू आपल्या नाकात घालताना दिसून येतो. माइकला असं करताना पाहून सर्व यूजर्सना धक्का बसतो. नाकात घातलेला हा साप पुढच्याच क्षणी त्याच्या तोंडातून बाहेर पडताना दिसतो. अर्धा साप नाकात आणि अर्धा तोंडाबाहेर हे संपूर्ण दृश्यच लोकांच्या समजण्या पलिकडचे ठरते. ज्या अर्थी त्याने जाणीवपूर्वक सापाला नाकात टाकले त्या अर्थी कदाचित हा साप विषारी नसावा. हेच कारण आहे की या स्टंटनंतरही त्याला काहीच झाले नाही. माइक होल्स्टन फ्लोरिडा स्थित झूलॉजिकल वाइल्डलाइफ फाउंडेशनशी संबंधित आहेत. ते जगभर प्रवास करून धोक्यात असलेल्या प्राण्यांसोबत वेळ घालवतात आणि वन्यजीव संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करतात. तथापि, त्यांच्या या सापाच्या स्टंटने मात्र सर्वांना हादरवून सोडले.
या अनोख्या स्टंटच्या व्हिडिओ @therealtarzann नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कल्पना करा की तो साप घसरुन जर त्याच्या घशात गेला तर काय होईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर त्याने तुमच्या मेंदूत जाण्याचा निर्णय घेतला तर?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तुमचं जर खरंच प्राण्यांवर प्रेम असेल तर तुम्ही त्याच्यांसोबत असं कसं करु शकता, यात कोणतीही शंका नाही की हे फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी केलं गेलं आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.