(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
हा व्हिडिओ सोशल मीडियावर असा दावा करून शेअर केला जात आहे की वराचा हात धरलेली मुलगी दुसरी कोणी नसून त्याची एक्स गर्लफ्रेंड आहे. स्टेवर येताच तिने वराच्या हाताचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यात वधूने केस पकडतच तिला खाली पाडले आणि रागातच तिला मारहाण केली. घटनेतील गंभारता पाहता वराने यात कोणताही हस्तक्षेप घेऊ पाहिला नाही. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात स्पष्ट दिसते की, वर, वधू आणि एक्स गर्लफ्रेंड स्टेवर फोटो काढत आहेत ज्यानंतर एक्स अलगद वराचा हात हातात घेऊन चुंबन घेण्याचा प्रयत्न करते ज्यानंतर वधूचा राग अनावर होते आणि स्टेवरच ती तिला चोप देऊ लागते. लग्नात घडलेल्या या सर्वच प्रकाराने वऱ्हाड्यांना थक्क केले तर काहींनी हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत वधूची बाजू घेतली आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, वधूने जे केले ते अगदी बरोबर होते.
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @theraktofficial नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिने बरोबर केले, अर्थातच तुम्हाला तुमच्या लग्नाच्या दिवशी तुमच्या जोडीदाराच्या एक्स गर्लफ्रेंडलने त्याचे/तिचे चुंबन घेताना पाहायला आवडणार नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वधूने जे केलं ते बरोबर आहे पण पहिला प्रश्न हा येतो की एक्सला आमंत्रण दिलंच कशाला?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती यासाठी पात्र आहे, एक्सला असं काही करायची काही गरज नव्हती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






