Delhi Metro Man slaps another man with Chappal Video Viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये दिल्ली मेट्रोचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी मेट्रोत डान्स करताना, तर कधी मेट्रोत कपल्सचा रोमान्स पाहायला मिळतात. सर्वात जास्त यामध्ये भांडणाचे व्हिडिओ पाहायाल मिळतात. यात महिलांच्या भांडणाचे व्हिडिओ तर विचारायला नकोच. कधी सीटवरुन भांडणे, तर कधी धक्का लागल्यावरुन भांडणे होत असतात. काही वेळा तर मेट्रोत जागा असूनही सतत भांडणे होत असतात.
यामध्ये काही पुरुषांच्या भांडणाचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन पुरुष एकेकांना बेदम मारताना दिसत आहे. एक व्यक्ती चप्पल काढून दुसऱ्या व्यक्तीला मारतो, तर दुसराही काही कमी नसतो. त्याला मारणाऱ्याला सटाटासट कानाखाली ठेवून देतो. दोघेही एकमेकांना बदाबदा हाणत असतात. याच व्हिडिओमध्ये आणखी एक भांंडणाच व्हिडिओ आहे, ज्यामध्ये दोन पुरुष मेट्रोच्या दारात भांडताना दिसत आहे. सध्या या भांडणाचे कारण समजलेले नाही, परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
दिल्ली मेट्रो में आज फिर आपका स्वागत है
आज अलग ही तरीका का अखाड़ा चालू किया गया है,आप सभी भाई आराम से देखे सबको
हंसने का मौका भरपूर दिया जाएगा। pic.twitter.com/M3QWs5aDrg— Shoaib Khan (@adv_soyyab) September 10, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @adv_soyyab या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओच्य कॅप्शमध्ये लिहिले आहे की, दिल्ली मेट्रोत तुमचे स्वागत आहे, आज वेगळाच आखडा पाहायला मिळाला, सगळ्यांनी आरामात पाहा, भरपूर हसायला मिळले असे म्हटले आहे. यावर अनेकांनी भन्नाट अशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, मेट्रोत भांडणे होत आहे, तर ट्रेनमध्ये प्रेम प्रकरणे. दुसऱ्या एका युजरने दिल्ली मेट्रोत रोज काही ना काही मनोरंजक गोष्टी पाहायला मिळतात असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.