Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेच बघायचं राहिलं होत… भगवान रामाच्या रूपात मोदींचा पुतळा? आरतीनंतर झाली ‘मोदी चालीसा’, Video Viral

दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कटआउटची भगवान रामाच्या रूपात पूजा करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत असून प्रेस क्लबने संबंधित कार्यक्रमाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2026 | 10:20 AM
हेच बघायचं राहिलं होत... भगवान रामाच्या रूपात मोदींचा पुतळा? आरतीनंतर झाली ‘मोदी चालीसा’, Video Viral

हेच बघायचं राहिलं होत... भगवान रामाच्या रूपात मोदींचा पुतळा? आरतीनंतर झाली ‘मोदी चालीसा’, Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रामाच्या रूपातील मोदींच्या कटआउटची आरती केल्याचा दावा
  • ‘मोदी चालीसा’ अन् ‘जय जय मोदी’च्या घोषणा
  • व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही इथे अनेक मजेदार व्हिडिओ पाहिले असतील पण अलिकडे मात्र जो प्रकार इथे शेअर करण्यात आलाय त्यातील दृष्ये पाहून तुम्ही हादरुन जाल. देशाचे पंतप्रधान यांचे भक्त देशात वेगाने वाढत असून अनेकदा सोशल मिडियावर यावरुन खिल्ली उडवली जाते. अलिकडे मात्र नरेंद्र मोदींना भगवान रामाचे रुप देण्यात आल्याचे दृष्य दिसले. इतकंच नाही तर मोदींची पूजा करत आरतीनंतर मोदी चालीसाही लावल्याचा दावा करण्यात आला. माणसाला असे देवाचे रुप दिलेले पाहून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच ट्रेंड करत आहे. चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral

काय आहे प्रकरण?

ही घटना एका प्रेस क्लबमध्ये घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ @TheSincereDude नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. घटनेवर टिका व्यक्त करताना व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, ‘प्रेस क्लबमध्ये ‘मोदी चालीसा’चे आयोजन आणि पंतप्रधानांचे देवतेच्या रूपात कट-आउट. तसेच ‘भगवान श्री नरेंद्र मोदी’ यांच्यासाठी ११२ कोटी रुपयांचे मंदिर उभारण्याची योजना आहे. ही काही भक्ती नाही. एका विद्यमान राजकारण्याला देव मानून हिंदू श्रद्धेचा पद्धतशीरपणे ऱ्हास करण्याचा हा प्रकार आहे. एका व्यक्तीच्या ‘व्यक्तिपूजेला’ (personality cult) संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी, खऱ्या देवतांची उपासना करणाऱ्या कोट्यवधी हिंदूंचा अपमान केला जात आहे. हे संविधानावर केलेले थेट आक्रमणही आहे. भारत हे एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक राष्ट्र आहे. कोणताही लोकप्रतिनिधी हा दैवी नसतो. सरकारी संबंध असलेल्या मंडळाचा वापर करून पंतप्रधानांना देवत्व बहाल करणे, हे राहुल गांधींनी संसदेत वर्णन केलेल्या ‘अंधभक्ती’चेच एक शुद्ध रूप आहे – जिथे लोकांना असे वाटते की ती एक व्यक्ती म्हणजे साक्षात देवच आहे. अशी माणसे सनातन धर्म आणि संविधान या दोघांचीही विटंबना करतात’.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात आपल्याला रामाच्या रुपात नरेंद्र मोदींचा कटआउट उभा केल्याचे दिसते. यात त्यांनी निळे वस्त्र, सोनेरी मुकुट आणि हातात धनुष्यबाण घेतलेला असतो. उपस्थित मेंबर्स या कटआउटची पूजा करु लागतात तर माहे ‘मोदी चालिसा’ नावाचे एक पोस्टर देखील ठेवण्यात आलेले असते ज्यावर आपल्याला पंतप्रधान मोदींचा फोटो दिसून येतो. व्हिडिओमध्ये लोक टाळ्या वाजवत ‘जय जय मोदी’ आणि ‘हर हर मोदी’च्या घोषणा करतानाही दिसून आले. दाव्यानुसार, ही घटना दिल्ली प्रेस क्लबमध्ये घडून आली. प्रेस क्लबने याबाबत स्पष्टीकरण देत सांगितले की, एका संस्थेने पत्रकार परिषद घेण्यासाठी हॉल भाड्याने घेतला होता. त्या संस्थेने हॉलच्या वापरासंबंधीच्या अटींचे कथितरित्या उल्लंघन केल्यामुळे प्रशासनाला तो कार्यक्रम थांबवावा लागला.

Modi Chalisa at Press Club. Cutout of the PM as a deity. ₹112 crore temple planned for “Lord Shri Narendra Modi.” This is not devotion. This is the systematic degradation of Hindu aastha by turning a sitting politician into a god. Crores of Hindus who worship actual deities… pic.twitter.com/cgCGbuII2n — Sincere Dibya (@TheSincereDude) August 20, 2026

५८ लाखांचं पॅकेज, घर-गाडी सगळं तरीही मुलगा मिळेना… चीनच्या ‘वधू बाजारात’ हंबरडा फोडून रडू लागली महिला; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने शेअर केला जात असून यातील दृष्यांवर यूजर्सने आपल्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “वेडेपणा! आधी जवाहरलाल, गांधी, आंबेडकर आणि आता खुद्द प्रभू राम. आपण त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत, असे त्यांना सुचवायचे आहे. असे केल्याने संपूर्ण जग भारताचे हस करेल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे, कोणीतरी हा मूर्खपणा थांबवा”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “प्रेस क्लबमधील तो कोण व्यक्ती आहे ज्याने त्यांना असं करण्यात परवानगी दिली”.

Web Title: Delhi press club modi cutout lord ram modi chalisa viral video controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • PM Modi
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral
1

मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral

५८ लाखांचं पॅकेज, घर-गाडी सगळं तरीही मुलगा मिळेना… चीनच्या ‘वधू बाजारात’ हंबरडा फोडून रडू लागली महिला; Video Viral
2

५८ लाखांचं पॅकेज, घर-गाडी सगळं तरीही मुलगा मिळेना… चीनच्या ‘वधू बाजारात’ हंबरडा फोडून रडू लागली महिला; Video Viral

कुकरच्या शिट्टीत लपवलं १ कोटींचं सोनं; दिल्ली विमानतळावर प्रवाशाचा भांडाफोड; Video Viral
3

कुकरच्या शिट्टीत लपवलं १ कोटींचं सोनं; दिल्ली विमानतळावर प्रवाशाचा भांडाफोड; Video Viral

गबरू जवानाचा माज उतरला, काकांशी पंजा लढवत होता… अखेर तरुणालाच फुटला घाम; मजेदार Video Viral
4

गबरू जवानाचा माज उतरला, काकांशी पंजा लढवत होता… अखेर तरुणालाच फुटला घाम; मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.