delivery boy touches women inappropriately video goes viral
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. या घटनेने सोशल मीडियावर संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
एका ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने महिलेला तिच्या प्रायव्हेट पार्टला पार्सल देताना स्पर्श केला. याचा सीसीटीव्ही फुटेज शेअर करत महिलेने ब्लिकिंटकडे तरुणावर कारवाईची मागणी केली आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. महिलने याचा व्हिडिओ शेअर करत सांगितले की, ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयने तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्ने केला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पार्सल देताना डिलिव्हरी बॉय महिलेच्या छातील हात लावताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेने सोशल मीडियावर कारवाईची मागणी केली जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत पुरुषांमध्ये तुफान हाणामारी, Video Viral
This is what happened with me today while ordering from Blinkit. The delivery guy asked for my address again and then touched me inappropriately. This is NOT acceptable. @letsblinkit please take strict action. #Harassment #Safety @letsblinkit …is women safety is joke in India? pic.twitter.com/aAsjcT3mnO — S🪐 (@eternalxflames_) October 3, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @eternalxflames_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त करत महिला आता कुठेही सुरक्षित राहिले नसल्याचे म्हटले आहे. अनेकांनी डिलिव्हरी बॉयवर कारवाईची मागणी केली आहे. महिलेने देखील संबंधित तरुणावर कडक कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने अशा लोकांना चाबकाने फटके दिले तरी अद्दल घडणार नाही असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने त्याचे हात कापून टाका असे म्हटले आहे. या घटनेने लोकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.