
Desi Jugaad Man Sleeping on Bike while driving left people stunned Video Goes Viral
Desi Jugaad Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, कधी भयावह गोष्टींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये जुगाडाचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. काही जुगाड असे असतात की पाहून तुम्ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, तर काही इतके भन्नाट जुगाड पाहायला मिळतात की लोक हैराण होऊन जातील. सध्या असाच एक भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पठ्ठ्याने असा जुगाड केल्या आहे की पाहून तुम्ही त्याचे कौतुक करला. शिवाय या दादाचा स्वॅग तर काही औरच आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण बाईकवर झोपलेला दिसत आहे. या तरुणाने बाईकवर मागे खाट टाकली आहे. त्याला मच्छरदानि लावली आहे. तर पुढे एक व्यक्ती बाईक चालवत आहे. तर हा तरुण मागे आरामात कानात हेडफोन्स घालून पायावर पाय टाकून मोबाईलमध्ये गेम खेळत बसला आहे. ही बाईक घेऊन पठठ्या गाडीवर फिरत आहे. त्याचा राजेशाही थाट पाहून अनेकजण हैराण झाले आहेत, तुम्हीही व्हाल.
तसेच तर असे जुगाडाचे व्हिडिओ अलीकडे सामान्य झाले आहेत. ज्या लोकांना लक्झरी लाईक जगायची असते पण पैशाअभावी जगता येत नाही. असे लोक काही वेळ घरातील तुटलेल्या वस्तूंपासून काही ना काही भन्नाट वस्तू तयार करुन त्याचा वापर करतात. आतापर्यंत तुम्ही अशाच तुटलेल्या जुगाडातून लोकांना बाईक बनवलेले, गाडी बनवलेली पाहिली असेल. जुगाडा करणाऱ्यांच्या मते यामुळे त्यांचा पैसा वाचतो आणि त्यांना हवी तशी लाईफ जगता येते.
व्हायरल व्हिडिओ
Jugaad pic.twitter.com/gBi01r7V8h — Bhumika (@sankii_memer) November 12, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sankii_memer या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी याला अल्ट्रा प्रो मॅक्स जुगाड म्हटले आहे. एकाने हा जुगाडा भारताबाहेर गेला नाही पाहिजे असे म्हटले आहे, तर एकाने भाऊचा थाट बघा असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंडे वेगाने व्हायरल होत आहे.
बंजी जंपिंग करताना रश्शी तुटली अन् अनर्थच घडला… कॅमेरात कैद झाला ऋषिकेशमधील भयानक थरार; Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.