कमबॅक असावा तर असा! खुल्या मैदानात चिमुकले डायनासॉर फिरताना दिसले, धक्कादायक दृश्य कॅमेरात कैद; Video Viral
सोशल मीडियावर हा आजकाल आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. तुम्ही इथे ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही आजवर सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना पाहिले असतील. मात्र सध्या इथे व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ फार अनोखा आहे. आम्हाला खात्री आहे की, असा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत कुठे पाहिला नसावा. आपण कल्पनाही करू शकणार नाही असे दृश्य यात कैद झाल्याचे दिसून आले आहे. याचा व्हिडिओ शेअर होताच लोक यांत्रिक दृश्य पाहून हादरली आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागली. आता यात नक्की असे काय दिसून आले ते जाणून घेऊया.
कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेल्या डायनासॉरबद्दल मानवाला नेहमीच अप्रूप वाटतं राहिले. त्यांच्याबद्दल संशोधन करणे आणि काहीतरी नवीन जाणून घेणे मानवांसाठी खूप रोमांचकारी आहे. डायनासॉरच्या अस्तित्वाबाबतही अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत. त्यातच आता नुकताच, डायनासॉरच्या अस्तित्वाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये डायनासॉरसारखे दिसणारे काही प्राणी मोकळ्या मैदानात फिरत असल्याचे दिसून येते. या प्राण्यांना पाहून असे वाटते की जणू ते डायनासॉरची मुले आहेत.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात खुल्या मैदानातील काही दृश्ये दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये पुढे आपल्याला काही चिमुकले प्राणी चालताना दिसतात. हे प्राणी हुबेहूब डायनासॉरसारखे दिसत आहेत. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसा तो झूम होतो आणि हे दृश्य आणखीन स्पष्ट दिसू लागतात. व्हिडिओमध्ये साधारण 8-10 डायनासॉर एकत्र फिरताना दिसून येत आहेत. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरून लुप्त झालेले हे प्राणी अचानक दिसून आल्याचे आता सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओ कितपत सत्य आहे याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप हाती आली नाही.
हा व्हिडिओ @sarcasticschool_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे तो माकडाचा रिवर्स व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे फेक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.