(फोटो सौजन्य: Youtube)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनासंबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात. व्हिडिओत अधिकतर प्राण्यांच्या शिकारीचे दृश्य दिसून येते जे पाहून अनेकदा लोक हादरतात. आताही इथे जंगलाचा राजा आणि जिराफमधील संघर्षाचा एक अनोखा व्हिडिओ शेअर झाला आहे. यात जंगलाचा बलाढ्य राजाला एका जिराफाने धूळ चाखवल्याचे दिसून येत आहे जे पाहून आता सर्वजण थक्क झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक मनोरंजक आणि आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका जिराफला 20 सिंहींच्या गटाने वेढले होते. वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ आवडणाऱ्या लोकांमध्ये या व्हिडिओची खूप चर्चा आहे. व्हिडीओमध्ये जिराफ एका छोट्या तलावाजवळ पाणी पीत आहे आणि यादरम्यान सिंहीणांच्या एका गटाच्या लक्षात येते. सिंहीणांच्या गटाने लगेच आपली रणनीती आखली आणि जिराफाच्या मागे गेला. सुरुवातीला जिराफाच्या हे लक्षात आले नाही, पण सिंहीणींनी त्याला घेरायला सुरुवात केल्यावर जिराफ जीव वाचवण्यासाठी धावला.
काय आहे व्हिडिओत?
सिंहीणींनी वेढलेले असतानाही जिराफ आपला जीव वाचवण्यासाठी धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. सिंहीणींनी त्याला अनेकवेळा पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु जिराफ त्याच्या वेगवान धावण्यामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे प्रत्येक वेळी निसटण्यात यशस्वी झाला. जिराफ किती वेगाने धावू शकतात आणि किती हुशारीने त्यांचे प्राण वाचवू शकतात याचा साक्षीदार आहे हा व्हिडिओ. हे पाहून हे सिद्ध होते की, निसर्गातील प्रत्येक प्राण्याची स्वतःची खास वैशिष्ट्ये आणि क्षमता आहेत, ज्यामुळे त्यांना कठीण काळात वाचवता येते.
अचानक फोन फुटला अन् महिलेच्या पॅंटला लागली आग, यानंतर पुढे जे घडलं… धक्कादायक Video Viral
जिराफ आणि सिंहीणींच्या गटातील या संघर्षाचा व्हिडिओ @Craghoppers नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 9 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिर्क्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “तो जिराफ सरपटत आणि कॅमेऱ्याच्या एवढ्या जवळ वळणे ही पाहण्यासारखी सुंदर गोष्ट होती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जिराफ सुटला याचा आनंद आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.