
Dangerous Diwali Stunt ( दिवाळीतील धोकादायक कृत्य )
सोशल मिडियावर अशाच एका काकांचा भन्नाट आणि तितकाच धोकादायक स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हातात पेटलेला फटाके धरून तो फिरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या स्टंटला ‘हेलिकॉप्टर स्टंट’ असे म्हटले जात आहे.
या व्हिडिओमध्ये काकांचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. एकीकडे फटाके फुटताना इतर लोक सुरक्षित अंतरावर उभे राहून काळजी घेत असतात, तर दुसरीकडे हे काका हातात पेटता फटाका घेऊन तो फिरवताना दिसतात. त्यांचा हा अनोखा अंदाज पाहून अनेकांना आश्चर्य वाटू शकते. पण दिवाळीच्या आनंदात त्यांनी केलेला हा प्रकार मनोरंजक वाटत असला, तरी त्यामागचा हेतू मोठा धोका ठरु शकतो.
Uncle got no chills for this diwali 😨🔥 The confidence on display is unbelievable. Every other person is probably standing miles away, covering their ears and praying for their fingers, while uncle is out here performing his own Diwali helicopter stunt. Jokes aside, holding or rotating a lit firecracker is extremely dangerous. The sparks and unpredictable explosions can cause severe burns, hand injuries and permanent damage. — Deepu (@deepu_drops) November 9, 2026
पेटलेला फटाका हातात धरणे किंवा तो फिरवणे अत्यंत धोकादायक आहे. फटाक्यातून बाहेर पडणाऱ्या ठिणग्या, उष्णता आणि अचानक होणारा स्फोट यामुळे हात, चेहरा आणि डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. काही वेळा अशा निष्काळजीपणामुळे कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते.
दिवाळीचा आनंद घेताना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गजेचे आहे. फटाके नेहमी मोकळ्या जागेत आणि सुरक्षित अंतर ठेवून फोडावेत.पेटते फटाके हातात धरू नयेत किंवा त्यांच्यासोबत कोणतेही स्टंट करू नयेत. कारण काही क्षणांच्या मनोरंजनासाठी आयुष्यभराचा धोका पत्करणे हे योग्य ठरत नाही. दिवाळीचा आनंद घ्या; मात्र सुरक्षिततेची काळजी घेऊनच!