किती गोंडस! प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांसोबत चक्क श्वानाने जोडले हात; व्हायरल VIDEO ने जिंकली नेटकऱ्यांची मने (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका शाळेचे मैदन दिसत आहे. नेहमीप्रमाणे सकाळी मुलांची प्रार्थना सुरु आहे. सर्व मुले अगदी शिस्तीत रांगेत उभे राहून हात जोडून प्रार्थना म्हणत आहेत. याच ठिकाणी एक श्वानही उभा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे श्वानही शिस्तीत उभा राहिलेला आहे. त्याने माणसांप्रमाणे आपल्या पुढच्या दोन्ही पायांना जोडले आहे. मुलांसोबत श्वानही प्रार्थनेत सहभागी झाला आहे. जणू काही तोही त्याच शाळेचा नियमित विद्यार्थी आहे. हा व्हिडिओ सिक्कीमच्या एका शाळेतील आहे. हे पाहून शाळेतील शिक्षकही थक्क झाले आहे. त्यांनी या गोंडस प्रसंगाचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @prasnna_02 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहे. लोकांनी त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसलेला नाही. एका नेटकऱ्याने मजेशीरपणे लिहिले आहे की, हा नक्कीच मागच्या जन्मी या शाळेचा विद्यार्थी असणार, तर दुसऱ्या एकाने लिहिले की, प्राण्यांना भाषा समजत नाही, पण भावना आणि संस्कार नक्कीच समजतात. अशा विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
काय म्हणावं याला…! पोस्टरवरही मुली सुरक्षित नाहीत, वृद्धाचा अश्लिल Video Viral, पाहून यूजर्स संतापले
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






